केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्सच्या व्यवस्थापनावर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आतापर्यंत भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मंकीपॉक्स महामारीचे स्वरूप घेणार नाही असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.
( हेही वाचा : दुकानाच्या पाट्या मराठीत न केल्यास पुढील आठ दिवसात कायदेशीर कारवाई)
केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्वे
- आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संसर्गजन्य कालावधीत रुग्ण किंवा त्यांच्या सामग्रीशी शेवटचा संपर्क झाल्यापासून 21 दिवसांच्या कालावधीसाठी लक्षणांसंदर्भात किमान दररोज निरीक्षण केले पाहिजे असे नमूद करण्यात आले आहे.
- आजारी व्यक्तीच्या कोणत्याही सामग्रीशी संपर्क टाळणे.
- संक्रमित रुग्णाला इतरांपासून वेगळे ठेवणे.
- रूग्णांची काळजी घेताना हाताची स्वच्छता आणि योग्य वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (PPE) वापरणे.
- संशयित रुग्ण आढळल्यावर त्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठवले जातील, असे मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगण्यात आले आहे. हे नमुने तपासणीसाठी इंटिग्रेटेड डिसीड सर्विलांस प्रोग्राम नेटवर्क अंतर्गत पाठवले जातील.
- ताप, डोकेदुखी, अंगदुखी, अंगावर पुरळ येणे अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास रुग्णाला हॉस्पिटलच्या आयसोलेशन रूममध्ये किंवा घरी वेगळ्या खोलीत ठेवण्यात येईल. रुग्णाला ट्रिपल लेयर मास्क घालावा लागेल.
- आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी मंकीपॉक्सची लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.