गुजरात: पाकिस्तानी बोटीतून 50 किलो ड्रग्ज जप्त

166

भारतीय तटरक्षक दल (आयसीजी) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) संयुक्त कारवाईत शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ 50 किलो हेरॉईन ड्रग्ज घेऊन जाणारी ‘अल साकार’ ही पाकिस्तानी बोट पकडली आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार ‘अल साकार’ या बोटीतून 50 किलो हेरॉईन ड्रग्जची खेप भारताच्या दिशेने आणली जात होती. याबाबत माहिती मिळताच आयसीजी आणि गुजरात एटीएसने आज, शनिवारी सकाळी कारवाई करत ही बोट जप्त केली आहे. अतिशय खराब हवामानातही आयसीजी आणि एटीएसच्या टीमने ही बोट जप्त करून स्थानिक जखाऊ बंदरावर आणली. यावेळी केलेल्या तपासणीत सदर बोटीत 50 किलो हेरॉईन ड्रग्ज आढळून आले. या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 350 कोटी रुपये आहे.

( हेही वाचा:  नाशिक बस दुर्घटनेवर पंतप्रधानांनी व्यक्त केली हळहळ; मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर )

याआधीही करण्यात आली आहे कारवाई

गेल्या वर्षभरातील आयसीजी आणि एटीएसची ही सहावी संयुक्त कारवाई आहे. तर, आयसीजीने ड्रग्जने भरलेली बोट पकडण्याची महिनाभरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानी बोटीतून सुमारे 200 कोटी रुपयांचे 40 किलो हेरॉईन एफएम जप्त करण्यात आले होते. यादरम्यान 6 जणांना अटक करण्यात आली, जे पाकिस्तानी असल्याची माहिती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.