Gujarat Riots: गुजरात दंगलीतील २२ आरोपींची निर्दोष मुक्तता

115

गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीतील २२ आरोपींना स्थानिक पंचमहल कोर्टाने निर्दोष मुक्त केलेय. या आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे नसल्यामुळे त्यांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यातील गोध्रा रेल्वे स्थानकावर २८ फेब्रुवारी २००२ रोजी स्थानिकांनी साबरमती एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना आग लावली होती. या बोगींमध्ये अयोध्येहून परतणारे कारसेवक प्रवास करीत होते. या घटनेत ५९ भाविकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून राज्यात दंगल उसळली होती. यात पंचमहल जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारात उपरोक्त २२ जणांना आरोपी बनवण्यात आले होते.

याप्रकरणी बचाव पक्षाचे वकील गोपाल सिंह सोलंकी यांनी सांगितले की, गोध्रा घटनेनंतर हालोल गावात उसळलेल्या दंगलीत १७ जणांची हत्या झाली होती. याप्रकरणी उपरोक्त २२ जणांना आरोपी बनवण्यात आले होते. त्यापैकी ८ जणांचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला होता. या आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे नसल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायाधीश हर्ष त्रिवेदी यांच्या न्यायालयाने मंगळवारी २४ जानेवारी २०२३ रोजी सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्तता केल्याचे ऍड्. गोपाल सिंह सोलंकी यांनी सांगितले.

(हेही वाचा – लखीमपुरी खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्राला सशर्त जामीन मंजूर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.