Gujarat Election 2022: मतदानाला येताय? तुमच्याकडील पाळीव जनावरेही आणा!

मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असतो. त्यामुळे निवडणुकीच्या काळात नागरिकांना मतदान करा, असे आवाहन आवर्जून केले जाते. दरम्यान, गुजरातमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी अनेक फंडे वापरण्यात येत असल्याचे दिसतेय. मतदानाला येताना तुमच्याकडील पाळीव प्राणी घेऊन या, तुम्ही मतदान करत असताना त्यांची तिकडे मोफत आरोग्य तपासणी केली जाईल, गरज वाटली तर उपचारदेखील केले जाणार आहे.

(हेही वाचा – Gujarat Elections: 20 लाख नोकऱ्या, 10 लाखांचा आरोग्य विमा; भाजपचा जाहीरनामा प्रदर्शित)

जुनागडच्या जिल्हा प्रशासनाने त्यांच्याकडील मतदानात मोठी वाढ व्हावी, यासाठी ही अनोखी युक्ती लढवली जात आहे. गाय, म्हशींपासून कुत्रे, मांजरांनादेखील तुम्ही मतदान केंद्रावर नेऊ शकता. मतदान केंद्रापासून जवळच पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी केंद्रे उभारली जाणार आहे. इतकेच नाही तर निवडणूक यंत्रणा मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान करवून घेत आहे. प्रत्येक उमेदवाराचे प्रतिनिधी, पोलीस, व्हिडीओग्राफर यांच्या उपस्थितीत हे मतदान करविले जाते.

ऑल व्होटर्स स्पिरिटेड, अवेअर अँड रिस्पॉन्सिबल’ अशी एक मोहीम मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी हाती घेतली. गांधीनगरमधील त्यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली असता त्यांनी याची माहिती दिली. २०१७ मध्ये गुजरातमध्ये ६९ टक्के मतदान झाले, ते वाढावे हे ध्येय त्यांनी समोर ठेवले. दरम्यान यंदा गुजरातमध्ये अभूतपूर्व मतदान व्हावे, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याला भरभरून प्रतिसाद मिळेल , हा विश्वास गुजरात मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here