गुजरात (Gujarat) हे एक विकसित राज्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी गुजरातचा कायापालट केला आणि गुजरात मॉडेल (Gujarat model) प्रसिद्ध झाले. गुजराती संस्कृती सुद्धा खूप जुनी आणि प्रचलित आहे. गुजराती लोक देवभोळे, धार्मिक असतात. गुजरात राज्यात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. मात्र कोणत्याही राज्यात फिरताना एक गोष्ट महत्वाची असते, ती म्हणजे तिथली खाद्य संस्कृती. (Gujarat Market)
आणि खरं सांगायचं तर खाद्य संस्कृती (Food culture) ही मोठमोठ्या हॉटेलमध्ये नाही पाहायला मिळत तर ती मिळते रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्टॉल्समध्ये… स्ट्रीट फूड (street food) सर्वांनाच आवडतं. मुंबईच्या स्ट्रीट फूडबद्दल अनेकांना माहिती आहे. पण गुजरातमध्ये गेल्यावर काय खायचं? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला गुजराती स्ट्रिट फूडची माहिती देणार आहोत… (Gujarat Market)
खमण ढोकळा :
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुजराती बांधव राहतात म्हणून खमण ढोकळ्याबाबत आपल्याला माहिती आहे. बेसनापासून बनवलेला, वाफवलेला मऊ ढोकळा खायला खूप भारी लागतो. त्यावर मोहरीच्या दाण्यांची फोडणी, म्हणजे आहाहा! आणि गोड आणि तिखट चटणीसोबत खाताना धम्माल येते. सोबत एखादी मिरचीही चावून खावी. (Gujarat Market)
फाफडा :
बेसनापासून तयार झालेले कुरकुरीत, तळलेला पदार्थ म्हणजे फाफडा. सणावाराला हा पदार्थ खायचाच असतो अशी एक पद्धत आहे. या फाफड्यासोबत “फाफडा चटणी” नावाची विशेष चटणी सुद्धा दिली जाते. तसेच पपईच्या चटणीसोबतही फाफडा खायचा आनंद वेगळाच आहे. (Gujarat Market)
(हेही वाचा – Maharashtra Kho Kho News : महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे नाईक – निंबाळकर यांची बिनविरोध निवड)
दाबेली :
दाबेली हा पदार्थही आपण बर्याचदा खाल्ला असेल. मात्र गुजरातची दाबेली खायची वेगळीच मजा आहे. हा पदार्थ कच्छमधून आला आहे. पावमध्ये भरलेले मॅश केलेले मसालेदार बटाटे, मसाला शेंगदाणे, शेव आणि डाळिंब असतात. हा पदार्थ भन्नाट चमचमीत असतो. (Gujarat Market)
पत्रा :
अळूच्या पानांवर मसालेदार बेसनाची पेस्ट, मोहरी आणि तीळ मिसळून लेप केला जाता आणि वाफवले जाते. आता हा पत्रा म्हणजे काय तर आपली अळूवडी बरं का… तर ही गुजराती स्टाईलची अळूवडी नक्की खा. (Gujarat Market)
शेव उसळ :
चटणी, कांदे आणि शेव टाकून मोड आलेल्या मसूरपासून हा चवदार चाट बनवला जातो. गुजरातमध्ये हा पदार्थ सर्रार रस्त्याच्या कडेला मिळतो. (Gujarat Market)
(हेही वाचा – IPL 2024, MI vs DC : रोमारिओ शेफर्डने शेवटच्या षटकात ३२ धावा कशा काढल्या?)
गांठिया :
गुजराती लोक चहासोबत हमखास गांठिया खातात. या कुरकुरीत बेसनाच्या काड्या म्हणजेच गांठिया. गांठिया वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळतात. तिखट गांठियाही छान लागतात. (Gujarat Market)
जिलेबी-फाफडा :
गोड जिलेबी आणि खारट फाफडा यांचे उत्कृष्ट संयोजन… हा गुजरातमध्ये हमखास मिळणारा पदार्थ आहे. (Gujarat Market)
पोंख भेळ :
हिवाळ्यात कोमल ज्वारीच्या बिया (पोंख) भाजून चटपटीत भेळ बनवली जाते. या भेळीला पोंख भेळ असे म्हणतात. ही भेळ सॉलिड लागते. एकदा खाल्ली तर जिभेला चटक लागते. (Gujarat Market)
(हेही वाचा – Cricket Pitch Length : क्रिकेटच्या खेळपट्टीची मापं, आकार आणि स्वरुप)
हंडवो :
तांदूळ, मसूर, ताक आणि दुधी भोपळा घालून बनवलेला एक चवदार केक. गुजरातमध्ये मेन कोर्स म्हणूनही हा पदार्थ खाल्ला जातो. (Gujarat Market)
डाकोर ना गोटा :
हा पदार्थ लाडवासारखा गोल पण मसालेदार असतो. बेसनापासून बनलेला हा पदार्थ बाहेरुन कुरकुरीत आणि आतून मऊ असतो. अतिशय पारंपारिक अशा या पदार्थाचा आस्वाद नक्कीच घ्यायला हवा. (Gujarat Market)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community