गुजरात दंगल प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गेले काही दिवस अटकसत्र सुरु आहे. दरम्यान, मंगळवार 12 जुलै रोजी रात्री उशिरा अहमदाबाद पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करत तीन लोकांना अटक केली आहे. यामध्ये मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, माजी पोलीस महासंचालक आर.बी.श्रीकुमार आणि बडतर्फ आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अटक केली आहे.
मागच्या ब-याच काळापासून संजीव भट्ट हे पालनपूर तुरुंगामध्ये अटकेत होते. पालनपूर तुरुंगामध्ये संजीव भट्ट यांना ताब्यात घेण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेची तुकडी त्यांना अहमदाबादमध्ये घेऊन गेली. आता गुजरात प्रकरणात संजीव भट्ट यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगल प्रकरणामध्ये निर्दोष लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ही अटक झाल्याची माहिती आहे.
( हेही वाचा: एकनाथ शिंदेंचं गुरुपौर्णिमेनिमित्त सूचक ट्वीट म्हणाले, “बाळासाहेबांच्या….” )
Join Our WhatsApp Community