बर्याचदा अनेक कवी एकाच फॉर्ममध्ये लिहितात. मात्र विविध फॉर्ममध्ये लिहिणारे कवी कमीच आहेत, त्यात चांगले लिहिणारे तर हाताच्या बोटावर मोजण्याइतके. त्यापैकी एक म्हणजे गुजराती कवी आहेत. त्यांचं नाव आहे वेणीभाई पुरोहित (Venibhai Purohit). वेणीभाई हे गुजराती कवी, गीतकार, लघुकथा लेखक आणि पत्रकार होते. त्यांनी संत खुर्सीदास हे टोपण नाव वापरुन पुष्कळ लेखन केले आहे.
भारत छोडो आंदोलनात भाग घेतला
वेणीभाईंचा (Venibhai Purohit) जन्म १ फेब्रुवारी १९१६ रोजी जामखंभलिया येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले. १९३९ ते १९४२ या काळात त्यांनी अहमदाबाद येथील प्रभात दैनिक, भारतीय साहित्य संघ आणि सस्तू साहित्यमध्ये मुद्रित शोधन केले होते. १९४२ मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला आणि दहा महिने तुरुंगवास भोगला.
१९४४ ते १९४९ दरम्यान प्रजाबंधू आणि गुजरात समाचार या संस्थांमध्ये त्यांनी काम केले. १९४९ ते आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी जन्मभूमी दैनिकात काम केले. भजन, गझल, सॉनेट अशा अनेक काव्यप्रकाराला त्यांनी हात घातला आहे. सिंजराव, गुलजारे शायरी, दीप्ती आणि आचमन हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह आहेत. त्याचबरोबर त्यांनी त्यांनी कंकू, करियावर, गुणसुंदरिनो घरसंसार, जोगीदास खुमान आणि दिवदंडी यांसारख्या अनेक गुजराती चित्रपटांसाठी गीते लिहिली. ३ जानेवारी १९८० रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
Join Our WhatsApp Community