Gauri Shankar Joshi : धुमकेतू म्हणून प्रसिद्ध असलेले गुजराती लेखक गौरीशंकर जोशी

काव्य शैली, रोमँटिसिझम आणि मानवी भावनांचे सशक्त चित्रण हे धूमकेतू यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते.

270
Gauri Shankar Joshi : धुमकेतू म्हणून प्रसिद्ध असलेले गुजराती लेखक गौरीशंकर जोशी

गौरीशंकर जोशी (Gauri Shankar Joshi) यांचा जन्म १२ डिसेंबर १८९२ रोजी राजकोट आणि गोंडल जवळील वीरपूर येथे झाला. गौरीशंकर वीरपूर शाळेत क्लार्क म्हणून नोकरी करत होते. या काळात त्यांनी चरित्रे, ऐतिहासिक कादंबऱ्या वगैरे वाचायला सुरुवात केली. वाचनाच्या सवयीमुळे त्यांना साहित्यात रस निर्माण होऊ लागला.

पुढे ते खाजगी शाळेमध्ये शिकवायला लागले. दरम्यान ते धुमकेतू (Gauri Shankar Joshi) या नावाने लिहू लागले. आपल्या कारकिर्दीत धूमकेतू यांनी ४९२ लघुकथा लिहिल्या आहेत. १९२६ मध्ये त्यांनी तनखा नावाचा लघुकथा संग्रह प्रकाशित केला. तनखाचे चार खंड हे गुजराती साहित्यातील खूप मोठी उपलब्धी मानली जाते. काव्य शैली, रोमँटिसिझम आणि मानवी भावनांचे सशक्त चित्रण हे धूमकेतू यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते.

(हेही वाचा – Weather Update: महाराष्ट्रात कसं असेल हवामान? वाचा…हवामान विभागाचा अंदाज)

त्यांच्या (Gauri Shankar Joshi) लघुकथा अनुभवाच्या बळावर साकारल्या गेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कथांमध्ये जिवंतपणा होता. त्यांनी २४ कथासंग्रह लिहिले आहेत आणि ३२ कादंबर्‍या लिहिल्या आहेत. तसेच नाटके आणि प्रवास वर्णने देखील लिहिली आहेत. प्रेम आणि मानवी भावना यांना स्पर्श करणारे लेखन केल्यामुळे गुजराती रसिकांच्या मनावर ते आजही राज्य गाजवत आहेत तसेच गुजराती साहित्यात (Gauri Shankar Joshi) त्यांचे नाव सन्मानाने घेतले जाते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.