रघुवीर चौधरी (Raghuveer Chaudhari) हे गुजराती भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार, कवी आणि समीक्षक आहेत. त्यांना जन्म ५ डिसेंबर १९३८ मध्ये झाला. त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखनही केले आहे. रघुवीर चौधरी गुजरात विद्यापीठात शिकवत होते आणि १९९८ मध्ये निवृत्त झाले. त्यांनी लिहिलेल्या उपरवास कथात्रयी या कादंबरीसाठी १९७७ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार (गुजराती) प्रदान करण्यात आला.
त्यांना २०१५ रोजी ५१ वा ज्ञानपीठ पुरस्कार (Jnanpith Award) प्रदान करण्यात आला. आतापर्यंत त्यांची ८० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गुजरातीशिवाय त्यांनी हिंदीतही लेखन केले आहे. त्यांनी लिहिलेले साहित्य खालीलप्रमाणे आहे:
काव्य : तमसा, वहेता वृक्ष पवनमां (Tamasa, Vaheta Tree Pawanama); उपन्यास : गोकुल मथुरा द्वारिका, पूर्वराग, अमृता, आवरण, वेणु वत्सला, उपरवास कथा-त्रयी, लागणी, सोमतीर्थ; कथा संग्रह : आकस्मिक स्पर्श, गेरसमज; नाटक : अशोकवन (Ashokavan), झूलता किनारा, सिकन्दर सानी; एकांकी : डिम लाइट; रेखाचित्र : सहरानी भव्यता; समीक्षण : गुजराती नवलकथा, अद्यतन कविता, वार्ता-विशेष, दर्शकना देशमां;भव्यता; समीक्षा: गुजराती कादंबरी, अद्ययावत कविता,
रघुवीर चौधरी (Raghuveer Chaudhari) यांनी केलेली ‘रुद्र महालय’ (Rudra Mahalaya) ही रचना गुजराती साहित्यातील अनमोल ठेवा मानली जाते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये अमृता, सहवास, अंतरवास, पूर्वरंग, वेणू वत्सल, तमाशा, त्रिलोगी उपवर, सोमतीर्थ आणि वृक्ष पटनामा ही प्रमुख मानली जातात. रघुवीर चौधरी (Raghuveer Chaudhari) हे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे चौथे गुजराती साहित्यिक आहेत. त्यांच्यापूर्वी उमाशंकर जोशी, पन्नालाल पटेल आणि राजेंद्र शहा यांना हा सन्मान मिळाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community