ATS ची मोठी कारवाई! गुजरातमध्ये पुन्हा हजारो कोटींचं ड्रग्ज जप्त

135

गुजरात हे भारतातील बेकायदा ड्रग्ज तस्करीचे प्रमुख केंद्र बनवल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कित्येकजा हजारो कोटी रूपयांचे विविध प्रकारचे ड्रग्ज गुजरातच्या बंदरावरून जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा नव्याने ड्रग्ज पकडण्यात आले आहे. दरम्यान गुजरात एटीएसकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

(हेही वाचा – मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! गुजरातमध्ये १ हजार कोटींचे ५१३ किलो MD ड्रग्ज जप्त)

गुजरात एटीएसने वडोदरा शहरात धाड टाकून 1 हजार 125 कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन अशाच एका कारवाईत 1 हजार 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने वडोदऱ्यातील एका बांधकाम सुरु असलेल्या फॅक्टरीवर मंगळवारी छापा टाकला इथून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. यामध्ये 225 किलो मेफेड्रोन ज्याची किंमत 1 हजार 125 कोटी रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 लोकांनाही ताब्यात घेतल्याची माहिती गुजरात एटीएसचे पोलीस अधीक्षक सुनील जोशी यांनी दिली.

जोशी यांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले अंमलीपदार्थ भरुच येथील गुजरात औद्यागिक विकास महामंडळ अर्थात जीआयडीसी सायखा इथल्या एका केमिकल कंपनीमध्ये तयार करण्यात आले आहे. ज्या फॅक्टरीमधून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे ती फॅक्ट्री सुरत येथील महेश वैश्नव आणि वडोदरा येथील पियूष पटेल नामक व्यावसायिकांच्या मालकीची आहे. तसेच राकेश मकानी, विजय वसोया आणि दिलीप वघासिया हे भरुच इथल्या प्रकल्पाचे मालक आहेत. या सर्व प्रकल्पाच्या मालकांना अटक करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.