अमेरिकेत पुन्हा गोळीबार; घरात घुसून 6 जणांवर अंदाधुंद गोळीबार

जगातील महासत्ता अमेरिकेला बंदूक कल्चर आव्हानात्मक ठरत आहे. सातत्याने अमेरिकेत गोळीबार झाल्याच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका 6 वर्षीय मुलाने शिक्षिकेवर गोळी झाडल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा एकदा कॅलिफोर्नियात गोळीबारीची घटना घडली आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील एका घरात घुसून काही बंदुकधारींनी केलेल्या गोळीबारात सहा जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये सहा महिन्यांच्या बाळासह त्याच्या आईचाही समावेश आहे. पोलीस अधिका-यांनी माहिती देताना या हल्ल्याबाबत सविस्तर वृत्त देत, मृतांचा आकडा जाहीर केला आहे.

( हेही वाचा: लातूर- पुणे एसटी बसचा भीषण अपघात; 45 प्रवासी जखमी, 14 जणांची प्रकृती गंभीर )

बंदुकधा-यांच्या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टार्गेटेड हल्ला होता. या हल्ल्यात सामील असलेल्या टोळीचा अंमली पदार्थ किंवा अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असावा, असा संशय आहे. सोमवारी पहाटे साडेतीन वाजता कॅलिफोर्नियाच्या जोक्विन व्हॅलीमधील टुलारे सॅन शहरातील एका घरावर दोन पुरुषांनी हल्ला केला आणि अनेक गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here