खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नूः पाकिस्तानने पढवलेला ‘पोपट’

स्वतंत्र खलिस्तानच्या नावे तो भारताविरुद्ध पोपटपंची करत आहे.

155

खलिस्तानी चळवळीचा म्होरक्या गुरपतवंत सिंह पन्नू अमेरिकेत राहून स्वतंत्र खलिस्तानची मागणी करत आहे. पन्नूचे कुटुंब पाकिस्तानातून पळून येऊन भारताच्या आश्रयाला आले. ज्या पाकिस्तानने पन्नूच्या पूर्वजांना सळो की पळो करुन सोडले, तोच पन्नू आता पाकिस्तानच्या आयएसआयचा पोपट झाला असून, स्वतंत्र खलिस्तानच्या नावे तो भारताविरुद्ध पोपटपंची करत आहे.

पन्नूचा जन्म अमृतसर-जंडियाला गुरु जीटी रोडवरील खानकोट गावात झाला. त्याचे वडील महिंदर सिंह फाळणीनंतर पाकिस्तानातून भारतात आले होते. त्यांची दोन्ही मुले गुरपतवंत सिंह आणि मंगवंत सिंह विदेशात वास्तव्याला आहेत. गुरपतवंत सिंह अमेरिकेत राहत असून, न्यूयॉर्कमध्ये लॉ ऑफिस चालवतो. जिथून भारताविरुद्ध कट कारस्थान रचण्याचे काम केले जाते.

आयएसआयचं बोलकं बाहुलं

पाकिस्तानकडून भारताविरुद्ध होत असलेल्या आतंकवादी कारवायांचा पन्नू सुद्धा एक भाग आहे. पन्नू जर्मनीतील आतंकवादी गुरमीत सिंह बग्गाच्या जवळचा मानला जातो. बग्गा लाहोरमधील रंजीत सिंह नीता याला ड्रोन आणि इतर साहित्य पुरवण्याचे काम करतो. ज्या माध्यमातून पंजाबमध्ये शस्त्र, अंमली पदार्थ पोहोचवण्याचे काम केले जाते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पंजाबातील तरुणांना या माध्यमातून आपल्या गटात सामील करुन घेण्याचे काम केले जाते. पंजाबमधील स्थानिक गुन्हेगार शस्त्र आणि अंमली पदार्थ विकून जो पैसा मिळवतात, त्याचा वापर खलिस्तानी चळवळीला खतपाणी घालण्यासाठी केला जातो.

गुरपतवंत सिंह पन्नूचा संबंध लंडनमधील पाकिस्तानी दुतावासाशी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 2018 साली लंडनमधील ट्रेफेलगर स्क्वेअर येथे खलिस्तानी समर्थकांनी एक मोर्चा काढला.

QN Affair

या मोर्च्यात पन्नूने आपल्या सिख फॉर जस्टिस या आतंकवादी संघटनेच्या माध्यमातून रेफरेंडम 2020 नावाने लंडन घोषणापत्र जाहीर केले. यात जगाच्या कानाकोप-यातील शिखांचे मत घेऊन, जनमताच्या आधारे भारतापासून पंजाब वेगळा करण्याचे षडयंत्र रचण्यात आले होते. पण त्याचा हा डाव फसला.

लंडनमधून पाकिस्तानी फंडिंग

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडनमधील पाकिस्तानी दुतावासातील गुप्तचर संघटना इंटर सर्व्हिस इंटेलिजन्समध्ये कर्नल स्तरावरील अधिकारी, भारताविरुद्ध लोकांना एकत्र आणण्याचे आणि त्यासाठी त्यांना पैशांचा पुरवठा करण्याचे काम करतात. काश्मिरमधून 370 आणि 35-ए कलम हटवल्यानंतर मोठी गोची झालेल्या पाकिस्तानने, आता खलिस्तानी चळवळीला इंधन पुरवून भडका उडवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मृतावस्थेत असलेली खलिस्तानी चळवळीला पुनर्जीवित करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. पाकिस्तानच्या सांगण्यावरुन लंडनमधील बुश हाऊस येथे 2019 साली भारतीयांवर हल्ले चढवण्यात आले होते. या हल्ल्यांत सिख फॉर जस्टिसचा हात असल्याचे तपासात समोर आले. पाकिस्तानी वेल्फेअर काऊंन्सिलच्या सोबत हे हल्ले करण्यात आले होते.

https://twitter.com/RATHA_RADHA/status/1104619259441733635?s=20

भारत सरकारची कारवाई

प्रतिबंधित कायदा 1967 मध्ये 2019 साली केंद्र सरकारने काही सुधारणा केल्या. त्यानुसार भारताविरुद्ध कट कारस्थान रचत असलेल्या व्यक्तीला आतंकवादी घोषित करण्यात येईल आणि त्याची भारतातील संपत्ती जप्त करण्यात येईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.

pannu 1

या नुसार भारत सरकारने 9 खलिस्तानी समर्थकांना आतंकवादी घोषित केले, ज्यात गुरपतवंत सिंह पन्नू सातव्या क्रमांकावर होता. त्यामुळे केंद्र सरकारच्या सुधारित कायद्यानुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने गुरपतवंत सिंह पन्नूच्या अमृतसरमधील दोन जमिनी 8 सप्टेंबर 2020 रोजी जप्त केल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.