हिंदू सनातन शास्त्रानुसार आषाढ पौर्णिमा या तिथीला महादेवाने दक्षिणमूर्ती शिवाचं रूप धारण केलं होतं आणि ब्रह्मदेवाच्या चार मानसपुत्रांना वेदांचं ज्ञान दिलं होतं. तसंच या दिवशी महाभारताचे रचयेते कृष्ण द्वैपायन व्यास म्हणजेच वेद व्यास यांचाही जन्म झाला होता. महर्षी व्यास संस्कृतचे मोठे पंडित होते. त्यांना आदिगुरुही म्हटलं जातं. त्यांच्याच सन्मानार्थ गुरु पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. (Guru Purnima 2024)
(हेही वाचा- RTE नुसार पुढील शैक्षणिक वर्षासाठी मुंबईतील २५ टक्के आरक्षित जागांसाठी ४७३५ विद्यार्थ्यांची निवड)
शास्त्रामध्ये ‘गु’ या अक्षराचा अर्थ अंधकार किंवा अज्ञान असा होतो आणि ‘रु’ या अक्षराचा अर्थ अंधकाराचा किंवा अज्ञानाचा प्रतिबंध करणारा असा होतो. म्हणूनच ज्ञानाच्या सहाय्याने अज्ञानाचा अंधकार दूर सारून प्रकाशाकडे म्हणजेच ज्ञानाकडे घेऊन जाणाऱ्याला गुरु असं म्हणतात. जशी ईश्वरासाठी ईश्वरभक्ती आवश्यक आहे तशीच गुरुंसाठी गुरुभक्ती ही आवश्यक आहेच. सद्गुरूंच्या कृपेने भगवंताचा साक्षात्कार होतो. गुरुंचा कृपाशीर्वाद असेल तर आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या अडचणींवर मात करता येते. (Guru Purnima 2024)
आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेच्या तिथीला गुरुपौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी गुरुपूजन करण्याची परंपरा आहे. गुरुपौर्णिमेच्या या तिथीपासून पुढे चार महिने नैसर्गिक वातावरणाच्या दृष्टिकोनातून सर्वोत्तम मानले जातात. या काळात वातावरण खूप गरमही नसते आणि खूप थंडही नसते. त्यामुळे हा काळ अध्ययन करण्यासाठी अगदी योग्य मानला जातो. (Guru Purnima 2024)
(हेही वाचा- Hardik Pandya : भारतीय संघाचं नेतृत्व गेलं, आता हार्दिकसाठी मुंबई इंडियन्सचं नेतृत्वही दुरापास्त?)
या काळात ज्याप्रमाणे सूर्याच्या उष्णतेने तापलेली धरणी थंड आणि सुपीक होऊन शेती पिकवण्यासाठी तयार होते, त्याचप्रमाणे गुरूंच्या चरणी लीन असलेल्या भक्तांना ज्ञान, शांती, भक्ती आणि योगशक्ती प्राप्त करण्याचं सामर्थ्य मिळतं. (Guru Purnima 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community