संपूर्ण महाराष्ट्र आज म्हणजेच सोमवार ३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. आपल्या गुरूंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या निमित्ताने महाराष्ट्रात शिर्डी साईमंदिर, अक्कलकोटसह विविध ठिकाणच्या मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जात आहे.
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत उत्साहाचे वातावरण
साईबाबांना गुरू स्थानी मानणारे हजारो साईभक्त शिर्डीत साईबाबांचरणी नतमस्तक होत गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी दाखल झाले आहेत. गुरुपौर्णिमेच्या आजच्या मुख्य दिवशी काकड आरती नंतर अखंड पारायण समाप्ती झाली. यावेळी श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणाची मिरवणूक काढण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे.
श्री क्षेत्र अक्कलकोटची प्रसिद्ध काकड आरती
श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुळ स्थान म्हणून अक्रृकलकोट प्रसिद्ध आहे. श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात. या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली असते. विशेष म्हणजे, पहाटे ५ वाजता या ठिकाणी स्वामींची काकड आरती केली जाते. अक्कलकोट शहर सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून ३८ कि.मी अंतरावर वसलेले आहे.
(हेही वाचा – उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी त्यात नवल नाही – राज ठाकरे)
गुरू पौर्णिमेनिमित्त गजानन महाराजांच्या शेगावात भक्तांची मांदियाळी
शेगावात संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. आज सकाळपासूनच शेगावच्या मंदिर परिसरात संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या दाखल झाले आहेत. संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनदेखील करण्यात आले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community