Gutilizer : फर्टिलायझर नव्हे तर गौटिलायझर, कृषी रसायनांच्या बाजारपेठेत आता झाली गोमय ऑर्गॅनिकची एंट्री…

गोमातेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तसेच नॅनो टेक्नॉलॉजी संशोधनाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या उत्पादनामुळे शेतकर्‍यांना आणि पर्यावरणालादेखील नक्कीच फायदा होईल.

3345
Gutilizer : फर्टिलायझर नव्हे तर गौटिलायझर, कृषी रसायनांच्या बाजारपेठेत आता झाली गोमय ऑर्गॅनिकची एंट्री…

गौ लाइफ सायन्सेसद्वारे वैज्ञानिक संशोधनातून ऑर्गॅनिक फर्टिलायझर तयार करण्यात आले आहे. या ऑर्गॅनिक फर्टिलायझरचे वैशिष्ट्य म्हणजे हे फर्टिलायझर वैज्ञानिक चाचण्यांद्वारे सिद्ध झाले असून त्याच्या वापराने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे गाईचे शेण आणि गोमूत्र नॅनो फॉर्म्युलेशनच्या माध्यमातून पोषक तत्वांमध्ये रूपांतरित केले जाते. या वैज्ञानिक पद्धतीने तयार केलेल्या उत्पादनाचे नामकरण गौ-ग्रो तसेच गौटिलायझर (Gutilizer) गोल्ड ऑर्गॅनिक फर्टिलायझर असे करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक नफा –

देशी गाईंचे संवर्धन व्हावे आणि गाईपासून मिळणार्‍या गोधनाचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने हे संशोधन करण्यात आले आहे. संशोधनाच्या परिणामांतून असे समोर आले आहे की गौटिलायझर्समुळे (Gutilizer) पारंपारिक शाश्वत शेती वाढू शकते तसेच जलसंवर्धन, जमिनीच्या पोषक तत्वांची उपलब्धता होऊ शकते आणि जमिनीच्या गुणवत्तेत सुधारणा घडून येऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नफा होतो. ऑर्गॅनिक तत्वांचा वापर केल्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पादन अधिक पौष्टिक आणि आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित होतात.

एस.एस.के. भारत ग्रुपची निर्मिती –

याविषयी बोलताना एस.एस.के. भारत ग्रूपचे व्यवस्थापकीय संचालक कार्तिकभाई रावल असे म्हणाले की, भारतातील प्राचीन ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून कृषी क्षेत्रात नवीन क्रांती घडवून आणणे हा या उत्पादनाच्या निर्मितीचा उद्देश आहे. देशी गायी जागतिक स्तरावर कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, अशाप्रकारची इकोसिस्टीम निर्माण करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. हे उत्पादन देशभरात फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून एस.एस.के. भारत ग्रुपच्या नेतृत्त्वाखाली लॉंच केले जाणार आहे.

New Project 2024 01 22T111123.830

गौटिलायझर –

गौटिलायझर्समुळे शेतकरी, शेती उत्पादन संस्था आणि गोशाळांचासुद्धा विकास होईल. कारण कृषीच्या उप-उत्पादनांची विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध होईल. तसेच हे तिन्ही क्षेत्र एकमेकांना जोडले जातील.

मेक इन इंडिया अंतर्गत प्रकल्प –

याबाबत अधिक माहिती देताना एस.एस.के. भारत ग्रूपचे व्यवस्थापकीय संचालक कार्तिकभाई रावल म्हणाले की, आम्ही हा प्रकल्प पूर्णपणे मेक इन इंडिया अंतर्गत तयार केला आहे. तसेच गौ लाइफ सायन्सेस हा केवळ एक स्टार्ट अप नसून जणू हे एक परिवर्तनकारी उत्पादन प्रदान करणारे यश आहे.

ऑर्गॅनिक फर्टिलायझर – 

लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की आज बाजारात अनेक प्रकारची रसायने विकली जातात, जी कृषी उत्पादनांसाठी सर्रास वापरली जातात. अशा परिस्थितीत ऑर्गॅनिक फर्टिलायझरची बाजारात दणक्यात एंट्री झाल्यामुळे एकप्रकारची नवी आशा निर्माण झाली आहे. याची ग्वाही म्हणजे हे उत्पादन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्याच्या हेतूने मुंबईतील व्यापार कार्यक्रमात अनेक प्रसिद्ध व्यापार्‍यांच्या, उद्योगपतींच्या उपस्थितीत ग्वाटेमाला आणि पॅराग्वेच्या राजदूतांसमोर सादर करण्यात आले. या प्रसंगी एस.एस.के. ग्रूपचे अध्यक्ष अधिवक्ता श्यामशंकर उपाध्याय यांची युरेशियाचे ट्रेड कमिश्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

हेही पहा –  

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.