छेदी जगन (Cheddi Jagan) हे एक गयाना देशाचे राजकारणी आणि डेंटिस्ट होते. त्यांचा जन्म २२ मार्च १९१८ साली झाला. १९५३ साली पहिल्यांदाच त्यांची निवड मुख्यमंत्री म्हणून झाली. त्यानंतर पुढे १९६१ ते १९६४ या काळामध्ये ब्रिटिशांच्या राजवटीत ते गयानाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. छेदी हे भारताच्या उपखंडाच्या बाहेरच्या देशाचे महत्त्वाचे राजकारणी असणारे पाहिले भारतीय होते.
छेदी जगन (Cheddi Jagan) यांनी आपली पत्नी जेनेट आणि फॉर्ब्स बर्नहॅम यांना एकत्र घेऊन पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टी स्थापन केली. तसेच आपल्या पार्टीचे पाहिले नेते म्हणून त्यांनी काम केले. गुयानाला युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रमुख लोकांपैकी छेदी जगन हे एक होते. १९६४ साली ब्रिटिश राजवटीत असलेल्या गयाना येथे झालेल्या निवडणुकीत छेदी जगन हे पराभूत झाले. पण त्यानंतर अठ्ठावीस वर्षांनी १९९२ साली पुन्हा सार्वत्रिक निवडणूका झाल्या तेव्हा छेदी जगन यांच्याकडे राजकारणातले अध्यक्षपद आले. १९९२ साली झालेल्या निवडणूका या निःपक्षपाती होत्या असं मानलं जातं.
(हेही वाचा Swatantra Veer Savarkar Film : ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ चित्रपट करमुक्त करावा; रणजित सावरकर यांची मागणी)
छेदी जगन (Cheddi Jagan) यांनी पूर्वापार चालत आलेल्या शासन करण्याच्या पद्धतींना विरोध केला आणि निव्वळ समाजवादी शासन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. जगन यांनी परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध धोरणे राबवली. छेदी जगन यांचे युनायटेड स्टेट्सचे तत्कालीन राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्याशीही चांगले संबंध होते.
जगन यांनी गयानाचे आर्थिक स्वरूप सुधारण्यासाठी गयाना येथील प्रमुख निर्यातीची साधने जसे बॉक्साईड, तेल आणि केळी यांचे उत्पन्न कसे वाढेल याकडे लक्ष दिले. तसेच त्यांनी राष्ट्रातील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीचे धोरण राबवले. जसे की, शिक्षण, वीजनिर्मिती, आरोग्य सुविधा, रस्ते, पूल, ड्रेनेज व्यवस्था, सागरी सुरक्षा या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. तसेच छेदी जगन यांनी अमेरिकेतील मुक्त व्यापारही सुधारण्यासाठी प्रयत्न केला.
Join Our WhatsApp Community