H.N Golibar : जाहिरात न घेता साप्ताहिक चालवणारा संपादक एच. एन. गोलीबार

178
H.N Golibar : जाहिरात न घेता साप्ताहिक चालवणारा संपादक एच. एन. गोलीबार
H.N Golibar : जाहिरात न घेता साप्ताहिक चालवणारा संपादक एच. एन. गोलीबार

एच. एन. गोलीबार यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९४९ रोजी अहमदाबाद येथे कच्छी मेमन कुटुंबात झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यात बॅचलर ऑफ आर्ट्स डिग्री मिळवली आणि पत्रकारितेत डिप्लोमा पूर्ण केला. नंतर त्यांनी पश्चिम जर्मनीतील हेडलबर्ग प्रेसमन स्कूलमधून प्रिंटिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला.

एच. एन. गोलीबार यांच्या वडिलांचं नाव नूरमोहम्मद जुसाभाई गोलीबार होतं. ते एन.जे. गोलीबार (H.N Golibar) या नावाने ओळखले जायचे. १९७१ मध्ये एच. एन. गोलीबार त्यांच्या वडिलांसोबत काम करू लागले. त्यांचे वडील अहमदाबाद येथून १९४७ पासून चक्रम साप्ताहिक प्रकाशित करत होते.

(हेही वाचा-Municipal Employees : मुंबईकरांना वाहनतळाची सुविधा देणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच नाही वाहने उभी करायला जागा)

पुढे या मासिकाचे नाव चक्रम चंदन ठेवण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी १९७६ मध्ये जाहिराती स्वीकारणे बंद केले, ही प्रथा अजूनही सुरू आहे. एच. एन. गोलीबार त्यांच्या साप्ताहिकात ते संपादन विभागात काम करतात आणि स्तंभ देखील लिहितात. ज्या साप्ताहिकाचे वैशिष्ट्य असे की हे साप्ताहिक फक्त वाचकांच्या प्रतिसादावर चालते. कारण यामध्ये जाहिराती चापल्या जात नाहीत.

एच. एन. गोलीबार (H.N Golibar) ऍटम गोलीबार या टोपण नावाने लिहितात. ते भयकथा आणि गुन्हे कथा लिहितात. जंतर मंतर, खेल खतनाक, जनमतीप, अल्ला बल्ला, रातराणी, भूत पालित, जिन्नत, संतकुडी, शुकन अपशुकन, हेराफेरी, भूत पिशाच, फाइल क्रमांक सातसो सात, वारसदार, जल्लाद, शिकंजो, घोर अघोरी, डंख अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांनी ८५ पेक्षाही अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.