सर्वाधिक लोकप्रिय असलेले सोशल मीडिया अॅप्लिकेशन मेटा कंपनीचा मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेलं व्हॉट्सअप अनेक भागात २५ ऑक्टोबर रोजी डाऊन झाल्याचे समोर आले होते. भारतासह अनेक देशात दुपारी १२ वाजेपासून साधारण २ तास व्हॉट्सअप बंद होते. हा प्रकार नेमका कशामुळे घडला, व्हॉट्सअप बंद पडलं होतं की ते हॅक झालं होतं? यासंदर्भातील सविस्तर अहवाल आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मागवला असल्याची माहिती समोर येत आहे.
(हेही वाचा – Recession 2022: जागतिक स्तरावर ‘ही’ कंपनी 4,000 कर्मचाऱ्यांना काढणार!)
दरम्यान, मंत्रालयाने या प्रकरणी मेटाला सविस्तर अहवाल सादर करणयाचे आदेश दिले आहे. दोन तासांपर्यंत का बंद पडलं होतं. याचे कारण मंत्रालयाने सांगितले आहे. दरम्यान, या प्रकरणाला सायबर सुरक्षेच्या दृष्टीनेही तपासत आहे. या कालावधीत कोणता सायबर हल्ला तर झाला नाही ना, ही शक्यता मंत्रालयाकडून तापसत आहे. त्यामुळे आता मेटाने सविस्तर अहवाल सादर करणं बंधनकारक असणार आहे.
सुरूवातीला इंटरनेटची समस्या असल्याने युजर्सने व्हॉट्सअपच्या गोंधळाकडे लक्ष दिले नाही. मात्र इतर वेबसाईट नीट सुरू असल्याने फक्त व्हॉट्सअपवर मेसेज येत-जात नसल्याने युजर्स गोंधळात पडले. तोपर्यंत सोशल मीडियावर युजर्सकडून तक्रारी सोशल मीडियावर येऊ लागल्या. तर काही वेळात ट्विटरवर #WhatsAppDown चा ट्रेंड सुरू झाल्याचे दिसून आले.
Join Our WhatsApp Community