हॅन्ड ग्लोव्हज पुरवठादारांचीही थकबाकी

वैद्यकीय शिक्षण संशोधन संचलनालयांतर्गत येणा-या १९ वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना औषध पुरवठा करणा-या हाफकिन या संस्थेने राज्यभरातील हॅन्ड ग्लोव्हज पुरवठादारांचीही थकबाकी ठेवली आहे. या संपूर्ण आठवड्यात तब्बल २० हॅन्ड ग्लोव्हज पुरवठादार एकामागोमाग एक वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयाच्या पाय-या झिजवून आपल्या थकीत रक्कमेची मागणी करुन हैराण झाले आहेत.

कोविड काळात वैद्यकीय स्वच्छेतासाठी राज्यभरातील १९ वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना त्वरित हॅन्ड ग्लोव्हज पुरवठा करण्याचे हाफकिनचे आदेश होते. त्यानुसार आम्ही हॅन्ड ग्लोव्हजचा पुरवठा केला, दोन वर्ष उलटले तरीही निर्धारित किंमतीच्या मूळ रक्कमेएवढी बिलाची रक्कम देण्यास हाफकिनकडून टाळाटाळ होत असल्याची तक्रार हेल्थिअम फार्माचे उत्पादक भरत शेट्टी यांनी केली. प्रशासकीय मान्यता न घेता हा व्यवहार झाल्याने थकीत रक्कम दिली जात नसल्याची सबब हाफकिनकडून दिली जात असल्याचेही शेट्टी म्हणाले.

(हेही वाचा पुण्याचा बिबट्या झाला अंबरनाथकर)

जेजे आणि नागपूर सरकारी रुग्णालयाकडूनही ठेंगा

साची मेडिको या फार्मा कंपनीकडून जेजे रुग्णालयाने कोविड काळाची सबब देत हॅन्ड ग्लोव्हज घेतले. मूळ रक्कमेतील केवळ १७ लाख आतापर्यंत मिळाले अजून ३० लाखांची थकबाकी असल्याची माहिती साची मेडिकोचे मनोज रावत यांनी दिली. दोन वर्षांपासून २३ लाखांच्या किंमतीची खरेदी नागपूर वैद्यकीय रुग्णालयाने केली. त्याची रक्कम अद्यापही मिळाली नसल्याचे रावत म्हणाले.

आमची गुंतवणूक क्षमता संपली…

कोविड काळानंतर संपूर्ण जगभरात आर्थिक व्यवहारात प्रचंड उलथापलथ झाली. प्रवासाचा खर्च परवडेनासा झाला. कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या. टेण्डनंतर हाफकिनकडून औषधांच्या गुणवत्तेची तपासणीही करण्याचा खर्च संबंधित फार्मा कंपन्यांना करावा लागतो. अशातच औषधांच्या थकित रक्कमे पाठोपाठ हॅन्ड ग्लोव्हज पुरवठादारही आता आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या तीन वर्षांतील कित्येकांच्या थकित रक्कमांचा आकडा करोडोंच्या घरात आहे. आमच्याकडे दुसरे उपजीविकेचे साधन नाही. थकित रक्कम न मिळाल्यास आम्हीदेखील हॅन्ड ग्लोव्हजचा पुरवठा बंद करु, असा निर्धार हॅन्ड ग्लोव्हज पुरवठादारांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here