मुंबईत पुन्हा खळबळ! आता ‘या’ भागात दहशतवादी हल्ला करण्याची धमकी

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये पुन्हा धमकीचा फोन

121

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये पुन्हा एकदा धमकीचा फोन आल्याचे समोर आले आहे. मुंबईतील हाजी आली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. दरम्यान, हा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये उल्हासनगरमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

(हेही वाचा – एलॉन मस्कचा ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना थेट मेल, ‘ऑफिसला येणार असाल तर…’)

मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये धमकीचे फोन येण्याचे सत्र सुरूच आहे. पुन्हा एकदा धमकीचा फोन आला असून मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी या फोनवरून देण्यात आली आहे. हा धमकीचा फोन आल्यानंतर तात्काळ ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या मुंबई पोलिसांसह बीडीडीएस, कॉन्वेंट वेनलाही पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर आणि एल अॅण्ड टीच्या प्रोजेक्टची तपासणी केली मात्र या तपासणीअंती काहीत हाती लागले नाही.

असे सांगितले जात आहे की, फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीने हाजीअली येथे १७ अतिरेकी येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला दिली. ज्या नंबरवरून फोन आला होता त्या नंबरवर पुन्हा फोन केल्यावर तो फोन बंद असल्याचे आढळले, अशी माहिती पोलिसांनी दिली. संबंधित फोन उल्हासनगरहून आल्याचे पोलीस तपासात उघड झाले. धमकीचा फोन करणारी व्यक्ती मानसिक रूग्ण असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. हा फोन गुरूवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास आल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.