Halal Free Diwali : दिवाळीची खरेदी करताय, सतर्क रहा…

222
Halal Free Diwali : दिवाळीची खरेदी करताय, सतर्क रहा…

दिवाळी म्हणजे आनंदाचे पर्व, दिवाळी म्हणजे प्रकाशाची उधळण, दिवाळी म्हणजे जुन्याची उजळण, दिवाळी म्हणजे दुर्गुणांचा नाश, दिवाळी म्हणजे सद्गुणात वृद्धी. (Halal free Diwali) भारतात सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या काळात वेगवेगळी नवीन खरेदी केली जाते आणि सणाचा आनंद घेतला जातो. या सणाचा आनंद व्यक्त करणे आणि बदलते वातावरण, परिस्थिती याला आनंदाने सामोरे जाणे यासाठी बळ या सणामुळे येत असते. परंतू हे सर्व करताना सामाजिक भान लक्षात घेवून आपण ज्या देशात रहातो, त्या देशाचे उन्नतीसाठी हातभार लावणे हे पण आपले सामाजिक कर्तव्य आहे. प्रस्तुत लेखात ‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरी करण्यामागील कारणमीमांसा देण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांना यातून बोध घेत योग्य अयोग्य ठरविता यावे, यासाठी लेखप्रपंच !

तुम्ही चिनी किंवा हलाल उत्पादने तर घेत नाही ना ?

अनेक लोक दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वर्षातून एकदा का असेना नवीन कपडे, वस्तू, इ. खरेदी करतात. दिवाळीनिमित्त भिंतींच्या रंगापासून तर घर खरेदी पर्यंत अनेक प्रकारचे खरेदी विक्री व्यवहार होतात. निरनिराळे खाद्य पदार्थ, मिठाई, नवीन कपडे, दागिने, वाहने, घर, जमीन खरेदी, नवीन व्यवसायाला सुरुवात इत्यादी दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात होत असतात. परंतु यावेळी आपल्याकडून कळत – नकळतपणे राष्ट्राला घातक ठरणाऱ्या कृती तर होत नाही ना याची दक्षता घ्यायला हवी. स्पष्टच सांगायचे झाले तर दिवाळीची खरेदी करतांना आपण हलाल प्रमाणित असलेली किंवा चिनी उत्पादने तर घेत नाही ना हे काळजीपूर्क बघायला हवे. (Halal free Diwali)

(हेही वाचा – Virat Kohli Baffled : ‘हा’ सोशल व्हायरल ट्रेंड विराटलाही नव्हता माहित)

हलाल प्रमाणित व्यवसाय म्हणजे काय ?

इस्लामला मान्य म्हणजे ‘हलाल’. जगात अनेक प्रकारचे हलाल व्यवसाय आहेत. हलाल उत्पादने इस्लाम मान्य असल्याने मुस्लिम राष्ट्रांमध्ये हलाल प्रमाणपत्र तेथील सरकार देत असतात. परंतु भारतामध्ये हलाल प्रमाणपत्र भारत सरकार देत नसून काही खाजगी आस्थापने, खाजगी संस्था हे प्रमाणपत्र देत असतात. हलाल प्रमाणित उत्पादन खरेदी केल्यास काय धोके निर्माण होतात हे बघूया. प्रमाणपत्राच्या माध्यमातून मिळालेला निधी दहशतवादी कारवाया करण्यासाठी आणि देश विघातक कारवायांमध्ये सक्रिय सहभागी असलेल्या संघटनांसाठी वापरण्यात येतो हे उघड झालेले आहे. त्यामुळे हलाल प्रमाणित उत्पादने जर आपण घेतली तर त्याचा पैसा आपण दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी अप्रत्यक्षपणे देत आहोत असेच होईल. ही उत्पादने घेणे म्हणजे आगीत तेल ओतल्या सारखे होईल. त्यामुळे आपण घेत असलेली उत्पादने हलाल प्रमाणित तर नाही ना, याची खात्री करूनच घेऊ या. कुठलीही खरेदी करतांना ती स्वदेशी आहे ना, याची खात्री करून घेऊन मगच घेऊ या. जेणेकरून आपल्या बांधवांना रोजगार मिळेल आणि हलाल प्रमाणित उत्पादनांसारख्या देशविघातक उत्पादनांना आळा बसेल. (Halal free Diwali)

हलाल व्यवसायाचे वाढते रौद्र रूप !

पूर्वी हलालची परिभाषा मांसाहारापुरता मर्यादित होती. हलाल प्रमाणपत्र हे आता केवळ खाद्यपदार्थांपुरता मर्यादित राहिलेले नाही, तर जमिनीचे व्यवहार, बिल्डिंग्स, बांधकाम व्यवसाय, दवाखाने, उपहारगृहे, सौंदर्य प्रसाधने, औषध अशा एक ना अनेक विविध प्रकारच्या गोष्टींमध्ये हलाल प्रमाणपत्राने शिरकाव केला आहे. आपण सतर्क राहून खरेदी न केल्यास हलाल प्रमाणित अर्थव्यवस्था ही भारतात समांतर अर्थव्यवस्था होईल. आणि त्यामुळे राष्ट्राचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. म्हणूनच हे वाढते रौद्र रूप नष्ट करणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. (Halal free Diwali)

आवाहन !

जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाले आहे. सर्वत्रच्या युद्धाची कारणे काय हे जर बघितलं, तर आतंकवादी कारवाया हेच एकमेव मुख्य कारण आहे. हलाल प्रमाणित उत्पादने घेणे म्हणजे तिसऱ्या महायुध्दासाठी साहाय्य करणे होईल. म्हणून हलाल प्रमाणित उत्पादने घेऊ नये, अशी विनंती आहे.

राष्ट्राची अंतर्गत सुरक्षा आपल्या हाती आहे !

आनंदाची दिवाळी आपण साजरी करता करता नकळतपणे आपण चुकीच्या वस्तूंची खरेदी करून दुःख तर विकत घेत नाही ना ! यासाठी सतर्कतेने व्यवहार करायला हवे. म्हणूनच हलालमुक्त दिवाळी साजरी करण्याकडे कटाक्षाने लक्ष देऊया. जागृत राहू या आणि इतरांना जागृत करून राष्ट्ररक्षणात अप्रत्यक्ष सहभाग घेऊ या. सीमेवर अहोरात्र पहारा देऊन आपले सैनिक बांधव राष्ट्राचे रक्षण करीत आहेत. तसेच राष्ट्राची अंतर्गत सुरक्षा आपल्या हाती आहे ! जागृत नागरिक सुद्धा एक सैनिक असतो हे लक्षात घ्यायला हवे. (Halal free Diwali)

चला तर !
यंदाची दिवाळी हलाल मुक्त करूया.

सौजन्य – हिंदु जनजागृती समिती
संकलक – श्री. पराग गोखले, संपर्क – 8983335517

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.