देशात सध्या हलाल मांसाला आणि हलाल प्रमाणित उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. हिंदू समाजाला जबरदस्ती हलाल पद्धतीचे मांस, तसेच उत्पादने घेण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे जागोजागी आंदोलने सुरु आहेत. तसेच, हलाल मुक्त दिवाळी असा ट्रेंडही सध्या ट्वीटरवर जोर धरत आहे. त्यामुळे हलाल मांस आणि हिंदू खात असेलेले झटका पद्धतीने मांस यात काय फरक आहे, ते जाणून घेऊया.
हलाल आणि झटका या मांस कापण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. हलाल मांसासाठी, प्राण्याची नळी कापली जाते आणि त्यामुळे तो काही काळानंतर मरतो. या प्रक्रियेत जनावरांच्या मानेला चिरले जाते. तर झटक्याच्या मांसामध्ये प्राण्याच्या मानेवर एका फटक्यात जोरदार प्रहार होतो. त्यामुळे एका झटक्यात त्याची मान धडापासून वेगळी होते त्याला तडफडत राहावे लागत नाही. हलाल मांसाला फक्त इस्लाममध्ये मान्यता आहे. त्याचबरोबर शीख समाजात हलालऐवजी झटक्याचे मांस खाण्याची प्रथा आहे.
हलाल मांसाबाबत इस्लामचे तज्ज्ञ काय म्हणतात?
इस्लाममध्ये हलाल मांसाविषयी काय म्हटले आहे यावर, लखनऊच्या ऐशबाग इदगाहचे इमाम मौलाना खालिद रशीद फरंगी महली यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला सांगितले की, ‘जर एखादा प्राणी मेला असेल, तर त्याचे मांस इस्लाममध्ये बेकायदेशीर आहे, तुम्ही ते वापरू शकत नाहीत. एखाद्या प्राण्याचा बळी देताना, आधी त्याला इस्लामच्या नियमानुसार चारा आणि पाणी दिले जाते. नंतर त्याला हलाल केले जाते. हलाल करताना कलमा वाचणे गरजेचे आहे. जर एखादा प्राणी नैसर्गिकरित्या मेला नसेल तर, त्याचे मांस इस्लाम धर्मात वर्ज्य आहे.
( हेही वाचा: Halal Product:” हलाल मुक्त दिवाळी अभियान” आहे तरी काय? )
हलालच्या पैशातून पोसले जाताहेत दहशतवादी
हलालला विरोध करणा-या लोकांचे असे म्हणणे आहे की, हलाल प्रमाणपत्रातून अल्पसंख्याक समुदाय (मुस्लिम) त्यांची इच्छा जगातील बहुसंख्य लोकांवर लादत आहेत. हिंदू वा इतर धर्मातील लोकांनी हलाल प्रमाणित अन्न का खावे? तसेच, हलाल प्रमाणपत्रातून जमा होणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा आरोप या लोकांकडून करण्यात येत आहे.