Hamas Israel conflict: ‘ओलिसांना सोडा…ही शेवटची संधी’; इस्रायलचा हमासला इशारा

167
Hamas Israel conflict: 'ओलिसांना सोडा...ही शेवटची संधी'; इस्रायलचा हमासला इशारा

इस्रायल आणि हमास यांच्यातील घनघोर युद्धाला ७ ऑक्टोबरला सुरुवात झाली. आजतागायत हे युद्ध अधिकाधिक तीव्र होत आहे. इस्रायली अधिकारी आणि रफाहमधील आगामी हल्ल्याबाबत आणि हमासमध्ये ओलीस ठेवलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी करार करण्याची शेवटची संधी दिली आहे.

यासंदर्भात शुक्रवारी, (२६ एप्रिल) तेलअवीवमध्ये इजिप्शियन आणि इस्रायली प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली. यावेळी पॅलेस्टिनी संघटना हमासवर ओलिसांच्या सुटकेसाठी करार करण्यासाठी दबाव आणण्यासाठी इजिप्शियन शिष्टमंडळ तयार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इस्रायलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, प्रयत्नांबाबत चर्चा करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या इजिप्शियन शिष्टमंडळातील चर्चा शुक्रवारी संपुष्टात आली, इस्रायलने दीर्घ-नियोजित हल्ला सुरू करण्यापूर्वी युद्धविरामाच्या करारासाठी ही “शेवटची संधी” असल्याचा इशारा इस्रायलने दिला आहे.

(हेही वाचा – GMG : गर्जे मराठी ग्लोबलची यंदा न्यू जर्सीमध्ये शिखर परिषद; महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी होणार विचारमंथन )

रफाह शहरातील हल्ला थांबवण्यासाठी ओलिसांच्या कराराला हमास विलंब करू देणार नाही, असा विश्वास इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. इस्रायलने ओलीस कराराच्या माध्यमातून युद्धविरामाचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.

नागरिकांची रस्त्यावर उतरून निदर्शने…
हमासकडे अजूनही शेवटची संधी आहे. इस्त्रायल रफाहमध्ये हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार आहे. लष्कराने काही दिवसांपूर्वी आणखी दोन राखीव दल सज्‍ज केली होती. हमासचा म्‍होरक्‍या अल-सिनवार हा गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलमध्ये झालेल्या हत्याकांडाचा मास्टरमाईंड मानला जातो. या हल्ल्यात सुमारे 1,200 इस्रायली सैनिक आणि नागरिक मारले गेले आणि गाझामध्ये 200 हून अधिक लोकांचे अपहरण करण्यात आले होते. अल-सिनवर हा रफाहा शहरातील बोगद्यांमध्ये लपला असल्‍याचा दावा इस्‍त्रायलने केला आहे. ओलिसांच्या सुटकेसाठी नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत.

रफाहवर हल्‍ला करण्‍यासाठी इस्‍त्रायल सज्‍ज
इस्‍त्रायलने रफाह शहर ताब्यात घेण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. आता सरकारची मान्‍यता मिळताच इस्‍त्रायल सैन्‍य ऑपरेशन सुरू करण्‍याचाही तयारीत आहे. इस्रायल गाझामधील रफाहवर हल्ला करण्यासाठी पुढे जाईल, जिथे इस्रायली सैन्य अद्याप पोहोचलेले नाही, असे काही दिवसांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितले होते. आता नेतन्याहू यांच्या सरकारच्या प्रवक्त्याचे म्‍हटलं आहे की, इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने हल्ल्यापूर्वी रफाह येथून पॅलेस्टिनींना स्थलांतरित करण्यासाठी ४०,००० तंबू खरेदी केले होते, प्रत्येक तंबूमध्ये १० ते १२ लोक बसण्याची क्षमता आहे. दरम्‍यान, संयुक्‍त राष्‍ट्रांनीही इस्रायलला रफाह शहरावर हल्ला करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.