१५,००० नागरिकांचा सहभाग, १.२५ किलोमीटरचा तिरंगा; मुंबईत निघणार ‘भव्य तिरंगा यात्रा’

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ हर घर तिरंगा’ उपक्रमाद्वारे देशातील प्रत्येक सामान्य नागरिकाला आपला लाडका तिरंगा फडकवण्याची सुवर्णसंधी दिली आहे. भारताच्या भूमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि आवाहनातून २५ कोटी नागरिक आपल्या देशाच्या गौरवासाठी स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवावर तिरंगा ध्वज फडकवणार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आमदार योगेश सागर यांनी १.२५ किलोमीटर अखंड तिरंगा ध्वज तयार करून नरेंद्र मोदी यांच्या ‘आजादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमाला एक नवे भव्य स्वरूप दिले आहे.

कधी, कुठे असणार भव्य तिरंगा यात्रा

दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता एक भव्य तिरंगा यात्रा उत्तर मुंबई मालाड (पश्चिम) स्वामी विवेकानंद मार्ग, शिव मंदिर नटराज मार्केट पासून प्रारंभ होऊन ते बोरीवली (पश्चिम) भागातील स्वामी विवेकानंद प्रतिमा जवळ या यात्रेची समाप्ती होणार आहे. एकूण १५,००० देशभक्त नागरिक हे विशाल अखंड तिरंगा हातात घेऊन यात्रा करतील. ३,५०० ते ४,००० नागरिक आपल्या हातात १.२५ किलोमीटरचा अखंड तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरतील ही कल्पनाच देशभक्तीची भावना उफाळून टाकणारी आहे. या तिरंगा यात्रेत उत्तर मुंबईतील सर्व आस्थापना, शाळा, महाविध्यालयातील हजारो विध्यार्थी सहभागी होणार आहेत.

अशी होणार यात्रेला सुरूवात

या यात्रेची सुरुवात सजवलेल्या ५० घोडेस्वारासह भव्य प्रदर्शन तिरंगा घेऊन पुढे जाणार आहे. भारतमाता रथासोबत हजार (१०००) मुली भगवा, हिरवा आणि पांढऱ्या रंगाच्या कपड्यांसह तिरंगा यात्रेत चालतील. त्या समूहातून ‘रंग दे बसंती चोला’ हे अदभूत दर्शन घडून येईल. स्वामीनारायण संप्रदाय, प्रजापिता ब्रह्मकुमारी, खोजा समाज वामनराव पै संप्रदाय, निरंकारी समाज, पुष्टी संप्रदाय, जैन समाज हे आमदार योगेश सागर यांच्या राष्ट्रभक्तीच्या यात्रेची शोभा वाढविणार आहेत. मालाड, कांदिवली, बोरीवली येथून निघालेल्या अखंड विशाल तिरंगा यात्रेच्या मार्गावर बारा (१२) ठिकाणी ढोलताशा, झांज, पखराज या विध्याच्या तालावर देशभक्तीपर गीतांवर भव्य स्वागत करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – Har Ghar Tiranga: घरी तिरंगा फडकवायचाय? मग असा हवा झेंड्याचा आकार)

या तिरंगा यात्रेच्या स्वागतासाठी मार्गावर बारा महाकाय कमानी तिरंग्याने सुसज्ज करण्यात येणार आहेत. विविध पारंपारिक वेशभूषेतील हजारो नागरिक या यात्रेत समावेश होणार आहेत. महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, माजी मंत्री मुंबई भाजपा उपाध्यक्ष आमदार योगेश सागर, विधानपरिषद सदस्य भाई गिरकर, विधान परिषद सदस्य, मुंबई अध्यक्ष प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, मनीषा चौधरी, सुनील राणे, नगरसेवक विविध संस्थाचे हजारो पदाधिकारी यांच्यासह सहभाग असणार आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या या ऐतिहासिक उपक्रमात सर्व नागरिकांनी तिरंगा यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आमदार योगेश सागर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here