ऐरोलीत ओव्हरहेड वायर तुटली! हार्बर लोकल ठप्प

मंगळवारी, ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास हार्बल मार्गावरील ऐरोली उपनगरीय रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर लोकल सेवा

ठप्प झाली. कार्यालयीन वेळेतच ओव्हरहेड वायर तुटल्याने नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली. संध्याकाळी ६ वाजल्यापासून ट्रान्स हार्बर लोकल सेवा ठप्प झाली. त्यामुळे घणसोली ते ऐरोली येथे लोकल ठप्प होती.म्हणून नोकरदार वर्गाची गैरसोय झाली. ही लोकल सेवा तब्बल एक-दीड तास बंद होती. त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रवासी अडकून पडले होते. विशेष म्हणजे संध्याकाळी पाऊस विजांच्या कडकडाटासह कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे त्यातच ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर लाईन ठप्प झाल्याने लोकल प्रवासाची गैरसोय झाली. हार्बर लाईन बहुतेक लॉक डाऊन मध्ये हार्बल लाईनवर मेगा ब्लॉक घेत नाहीत. त्यामुळेच देखभाल दुरुस्ती अभावी हार्बल लाईन ठप्प झाल्याचे दिसून आले आहे.

(हेही वाचा : अरेच्चा…अवघ्या सहा दिवसांत खटला निकाली, शिक्षाही ठोठावली!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here