Harivansh Rai Bachchan : हरिवंश राय बच्चन यांचा जीवन परिचय

794
Harivansh Rai Bachchan : हरिवंश राय बच्चन यांचा जीवन परिचय
Harivansh Rai Bachchan : हरिवंश राय बच्चन यांचा जीवन परिचय

वृक्ष हों भले खड़े,
हों घने हों बड़े,
एक पत्र छाँह भी,
माँग मत, माँग मत, माँग मत,
अग्निपथ अग्निपथ अग्निपथ।

ही कविता प्रत्येक भारतीयाला पाठ आहे. हरिवंश राय बच्चन हे हिंदीतले प्रसिद्ध कवी आणि बीग बी अमिताभ बच्चन यांचे वडील. हरिवंश राय (Harivansh Rai Bachchan) यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ रोजी कायस्थ कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रताप नारायण श्रीवास्तव व आईचे नाव सरस्वती देवी. लहानपणी त्यांना बच्चन म्हटलं जायचं. बच्चन म्हणजे लहान मुलगा किंवा बाळ…

त्यांनी कायस्थ शाळेत प्रथम उर्दू आणि नंतर हिंदीत शिक्षण घेतले. प्रसिद्ध इंग्रजी कवी डब्ल्यू.बी. येट्स यांच्या कवितांवर संशोधन करून त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजीमध्ये एम.ए आणि केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. पूर्ण केली. १९२६ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी श्यामा बच्चन यांच्याशी विवाह केला. त्या वेळी त्या १४ वर्षांच्या होत्या. १९३६ मध्ये टीबीमुळे श्यामा यांचा मृत्यू झाला. पाच वर्षांनंतर १९४१ मध्ये बच्चन यांनी रंगभूमी आणि गायनाशी संबंधित असलेल्या तेजी सूरी यांच्याशी विवाह केला.

(हेही वाचा-IND vs AUS 2nd T20 : ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, भारताची २ – ० ने आघाडी)

त्यांचा काव्यप्रवास लहानपणापासून सुरू झाला आणि शालेय जीवनापासूनच ते छंदोबद्ध कविता रचत. १९३३ मध्ये बनारस हिंदू विद्यापीठात झालेल्या कविसंमेलनात त्यांनी ‘मधुशाला’ ही कविता सादर केली आणि लोकांनी त्यांची खूप स्तुती केली. हळूहळू त्यांची रंगमंचावर कीर्ती इतकी वाढली की प्रेमचंद यांनी त्यांचे कौतुक केले.

त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘तेरा हार’ १९३२ मध्ये प्रकाशित झाला. १९३५ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘मधुशाला’ या त्यांच्या दुसऱ्या काव्य संग्रहामुळे त्यांची लोकप्रियता आणि कीर्ती वाढली. या दोन काव्यसंग्रहांशिवाय त्यांचे इतर पुष्कळ संग्रह प्रकाशित झाले आहेत. कवितांव्यतिरिक्त त्यांची आत्मचरित्रे आणि त्यांची भाषांतरे ही देखील उत्कृष्ट साहित्यकृती आहे. त्यांनी बालसाहित्य आणि निबंधही लिहिले आहे.

त्यांनी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात हिंदी तज्ञ म्हणून काम केले होते. तसेच ते राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य देखील होते. बच्चनजी (Harivansh Rai Bachchan) यांची गणना हिंदीतील सर्वात लोकप्रिय कवींमध्ये केली जाते. जानेवारी २००३ पासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. १८ जानेवारी २००३ रोजी मुंबईत श्वसनाच्या आजाराने त्यांचे निधन झाले.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.