नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आणखी एक मोठी दुर्घटना…

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी वैष्णोदेवी चेंगराचेंगरी पाठोपाठ आता हरियाणातील भिवानी जिल्ह्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी घटना घडली आहे. भिवानी जिल्ह्यात डोंगर खचल्यामुळे 8 ते 10 वाहने खाली दबली गेली. यामध्ये जवळपास 15 ते 20 लोक अडकली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आतापर्यंत 3 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

अनेक जण दबल्याची शक्यता

डाडम खाण क्षेत्रातील डोंगराचा मोठा भाग खचल्याने ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच, प्रशासनाने त्वरित मदतकार्याला सुरुवात केली आहे. कृषी मंत्री जेपी दलाल आणि एसपी अजित सिंह शेखावत यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. डोंगर खचल्याने त्याखाली दबलेल्या गाड्यांमध्ये अनेक जण असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या बचावकार्य सुरु असून पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहे. या घटनेत खाणीमध्ये वापरण्यात येणारी पोपलॅंड आणि अन्य काही मशिनही दबल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना सध्या रुग्णालयात दाखल करण्याचेही काम सुरु आहे.

( हेही वाचा: कोरोनाचा मंत्र्यांना विळखा! मागील आठवडाभरात किती मंत्र्यांना झाली लागण? )

कारण अद्याप अस्पष्ट

खाणकामात वापरल्या जाणाऱ्या पॉपलँड आणि इतर अनेक मशिन्सही ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या आहेत. डोंगर घसरण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. डोंगर घसरला की स्फोटामुळे हा अपघात झाला, याबाबत अद्याप काहीही सांगता येणार नाही. जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here