Kumar Vishwas ’कोई दिवाना कहता है, कोई पागल समझता है’ ही कविता ऐकलीय का?

246

कुमार विश्वास (Kumar Vishwas) हे सर्वांच्या परिचयाचं नाव आहे. ते सुप्रसिद्ध हिंदी कवी, व्याख्याते आणि राजकीय नेता आहेत. कुमार विश्वास यांचा जन्म १० फेब्रुवारी १९७० रोजी उत्तर प्रदेशातील पिलखुवा गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील चंद्र पाल शर्मा हे आर.एस.एस. डिग्री कॉलेजमध्ये लेक्चरर होते. सुर्वातीला वडिलांच्या इच्छेनुसार कुमार विश्वास अभियांत्रिकी महाविद्यालयात दाखल झाले. मात्र काही काळातच त्यांना वाटू लागले की त्यांना साहित्यात कारकीर्द केली पाहिजे. पुढे त्यांनी हिंदी साहित्याचा अभ्यास करुन पीएचडी मिळवली.

२०१८ मध्ये त्यांनी के.व्ही. संमेलन हा आज तकवरील शो होस्ट केला. त्याचबरोबर ते हिंदी, उर्दू आणि संस्कृत कवितांचे कार्यक्रम करु लागले. देसाबाहेरही यूएस, यूके, दुबई, ओमन, सिंगापूर आणि जपानमध्ये जाऊन त्यांनी कवी संमेलन गाजवली आहेत. विश्वास हे ‘आप’चे संस्थापकीय सदस्य आहेत. अण्णा हजारेंच्या ’भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात; त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

(हेही वाचा : Uttarakhand UCC : समान नागरी कायद्याच्या विरोधात उत्तराखंडात ‘शाहीन बाग’ची पुनरावृत्ती होणार?)

ते इंडियन आयडॉल टेलिव्हिजन शोचे गेस्ट जज राहिले आहेत आणि झी टीव्हीच्या टॅलेंट हंट शो सा रे ग मा प लिल चॅम्प्समध्ये पाहुणे म्हणून आले होते. त्यांनी २०१८ च्या परमाणू: द स्टोरी ऑफ पोखरण’ आणि वीर भगत सिंह’ या हिंदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली आहेत. त्यांनी तर्पण ही संगीतमय काव्य मालिका देखील सादर केली आहे. कुमार विश्वास (Kumar Vishwas) तरुणांमध्ये प्रसिद्ध झाले ते ’कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है’ या कवितेमुळे. त्यांचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आणि कॉलेजच्या मुलांच्या ओठांवर ही कविता येऊ लागली. आम्ही तुमच्यासाठी ही पूर्ण कविता देत आहोत. कवितेचा आस्वाद नक्की घ्या आणि ’वाह वाह!’ करायला विसरु नका.

कोई दीवाना कहता है, कोई पागल समझता है !
मगर धरती की बेचैनी को बस बादल समझता है !!
मैं तुझसे दूर कैसा हूँ , तू मुझसे दूर कैसी है !
ये तेरा दिल समझता है या मेरा दिल समझता है !!

मोहब्बत एक अहसासों की पावन सी कहानी है !
कभी कबिरा दीवाना था कभी मीरा दीवानी है !!
यहाँ सब लोग कहते हैं, मेरी आंखों में आँसू हैं !
जो तू समझे तो मोती है, जो ना समझे तो पानी है !!

समंदर पीर का अन्दर है, लेकिन रो नही सकता !
यह आँसू प्यार का मोती है, इसको खो नही सकता !!
मेरी चाहत को दुल्हन तू बना लेना, मगर सुन ले !
जो मेरा हो नही पाया, वो तेरा हो नही सकता !!

भ्रमर कोई कुमुदुनी पर मचल बैठा तो हंगामा!
हमारे दिल में कोई ख्वाब पल बैठा तो हंगामा!!
अभी तक डूब कर सुनते थे सब किस्सा मोहब्बत का!
मैं किस्से को हकीक़त में बदल बैठा तो हंगामा!!

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.