महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंनी नाशिकपासून महाराष्ट्र दौऱ्याचा श्री गणेशा केला. राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौऱ्यांचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आले आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी पाहुणचार
पुणे दौऱ्याची सुरुवात राज ठाकरे यांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी पाहुणचार करून केली आहे. शिवाजीनगर गावठाण येथील अनिकेत ढगे याच्या घरी राज ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांनी नाश्त्याला चहा, थोडंसं उपीट आणि पोहे खाऊन दौऱ्याची सुरुवात केली आहे. ढगे कुटुंबीयांनी सकाळपासूनच घरात विविध पदार्थ करत ठाकरे यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती. ठाकरे घरी येणार असल्याचं समजताच मोठ्या प्रमाणात आनंद झाला होता, अशी भावना यावेळी ढगे कुटुंबीयांनी व्यक्त केली.
( हेही वाचा : राज ठाकरे म्हणतायत, ‘लोक मला फुकट घालवत आहेत!’ )
पश्चिम महाराष्ट्रात पक्ष बांधण्याची तयारी
दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज ठाकरेंनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत शिवतीर्थावर बैठक बोलावली होती. यावेळी उपशहराध्यक्ष, नगरसेवक आणि विभागप्रमुखांशी राज ठाकरेंनी संवाद साधला. या दौऱ्यादरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पुण्यात होणार आहे. राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्रात मनसेची पक्ष बांधण्याच्या तयारीत आहेत.
Join Our WhatsApp Community