कोविड काळात रुग्णसेवा बजावणाऱ्या कंत्राटी परिचारिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या काळातील ५९७ परिचारिकांना कायमस्वरुपी कामावर रुजू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड काळात आरोग्य विभागात कंत्राटी स्वरूपात विविध विभागांमध्ये भरती करण्यात आली होती.
( हेही वाचा : बेस्टमुळे एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान; काय आहे कारण?)
आरोग्य विभागाचा मोठा निर्णय, ५९७ परिचारिका कायमस्वरुपी सेवेत
कोविड काळात निरंतर रुग्णसेवा देणाऱ्या कंत्राटी परिचारिकांना आरोग्य विभागाने मोठा दिलासा आहे. या परिचारिकांचे ११ महिन्यांचे कंत्राट होते, संसर्ग कमी झाल्यावर त्यांचे कंत्राट पुन्हा रिन्यू करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे सेवेत कायमस्वरूपी दाखल करून घेण्यासाठी परिचारिकांनी अनेकवेळा मागण्या केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारची अनुमती घेऊन या परिचारिकांना सेवेत कायमस्वरूपी समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community