ओमायक्रॉनसाठी काय आहेत नवे होम क्वारंटाईनचे नियम, वाचा…

देशात कोरोना संसर्ग आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अनेक नियमांत बदल केले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने होम आयसोलेशनसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे (गाईडलाईन्स) जारी केली आहेत. सौम्य लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असणारे होम क्वारंटाईन्सबाबतचे नवे नियम जारी केले आहेत. या नव्या मार्गदर्शक नियमांनुसार, कोरोनाबाधित रूग्णांच्या आयसोलेशनचा कालावधी तीन दिवसांनी कमी केला आहे. याआधी 10 दिवसांचे आयसोलेशन अनिवार्य करण्यात आले होते. होम क्वारंटाईनच्या या नव्या गाईडलाईन्स सर्व राज्यांनी तातडीने लागू करण्याचे निर्देशही केंद्र सरकारने दिले आहेत.

(हेही वाचा – ‘बेस्ट’च्या ताफ्यात कोरोनाची एन्ट्री! ६६ कर्मचाऱ्यांना बाधा)

वाचा नवे होम क्वारंटाईनचे नियम

  • होम क्वारंटाईन असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना किमान 7 दिवस क्वारंटाईन राहणं बंधनकारक
  • होम क्वारंटाईनचा कालावधी संपल्यानंतर रूग्णांना पुन्हा कोरोना चाचणी करण्याची गरज नाही.
  • सौम्य आणि लक्षणे नसलेले रुग्ण जे होम आयसोलेशनमध्ये असतील त्यांना जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षाच्या सतत संपर्कात राहणं अनिवार्य असणार आहे. तसेच त्यांची चाचणी करण्याची गरज भासल्यास त्यांना रुग्णालयात बेड वेळेवर मिळण्यास मदत होईल.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रूग्णाला स्टेरॉइड्स, सीटी स्कॅन आणि छातीचा एक्स-रे करण्यास मनाई
  • लक्षणे नसलेल्या आणि सौम्य-लक्षणे असलेल्या रुग्णाला ज्याची ऑक्सिजनची पातळी 93% पेक्षा जास्त आहे त्यांना होम क्वारंटाईन राहता येईल
  • एचआयव्ही बाधित किंवा कर्करोगाच्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच होम आयसोलेशनमध्ये राहण्याची परवानगी मिळणार
  • लक्षणं असलेल्या रुग्णांना आहारात जास्तीत जास्त द्रव पदार्थ खाण्याचा सल्ल्यासह रुग्णांना ट्रीपल लेअर मास्क वापरण्याचा सल्ला
  • घरात व्यवस्थित वेंटिलेशनची सोय असेल अशा सौम्य लक्षणं असलेल्या रूग्णांना घरी उपचार घेता येतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here