चंद्रपूरात पावसाचा कहर! बल्लारपूर- राजूरा- हैदराबाद मार्ग बंद

काही अपवाद वगळता चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी अद्यापही धोका कायमच आहे. परिणामी पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील काही रस्ते बंद आहेत, तर काही भागातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे. पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. माजरी, चारवट, हडस्ती येथील ईरई नदीचे पुलावर जवळपास ७ फूट पुराचे पाणी असल्याने दोन्ही गावांचा मार्ग बंद आहे. दरम्यान बामणी येथील वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी वाढल्याने बल्लारपूर- राजूरा- हैदराबाद मार्ग बंद झाला आहे.

पुराच्या पाण्याने या गावचा संपर्क तुटला

दहेली येथे वर्धा नदीचे पाणी वाढल्याने येथील २० कुटुंबातील सदस्यांना शाळेत रात्री ठेवण्यात आले. चारवट येथील १८ कुटुंबातील सदस्यांना नवीन चारवट येथे स्थलांतरित करण्यात आले. हडस्ती, चारवट, जुनी चारवट येथे सभोवताल सोमवारी रात्रीपासून पुराचे पाणी असल्याने संपर्क तुटला आहे.

(हेही वाचा – चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचं थैमान! पुरात अडकलेल्या 700 ते 800 नागरीकांचे स्थलांतरण)

नदीला पूर आल्याने ९०० घरं पाण्याखाली

वर्धा नदीला पूर आल्याने बल्लारपूर तालुक्यातील वेकोलीच्या सर्व कोळसा खाणी पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे वेस्टर्न कोल्फिल्डचे दररोज कोट्यवधीचे नुकसान होत आहे. वर्धा जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात आल्याने वर्धा नदीला पूर आला आहे. भद्रावती तालुक्यातील माजरी गावाला पुराचा वेढा आहे. ९०० घरं पाण्याखाली आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here