मुंबईत मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत; कोणत्या भागात काय परिस्थिती?

92

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. सतत कोसळणाऱ्या पावसाने लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अनेक भागात रस्त्यांवर कंबरेइतके पाणी साचल्याने त्याचा रस्स्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी चार चाकी वाहनं, दुचाकी बंद पडल्याने लोकांना अडचणींचा सामना करावा लागला.

(हेही वाचा – रत्नागिरीतील नद्या धोक्याच्या पातळीवर)

तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत ४ जुलैपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज ५ जुलैलाही पावसाचा जोर कायम असल्याने मुंबईकरांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई शहरातील विलेपार्ले, अंधेरी सबवे, हिंद माता, कुर्ला, वांद्रे आदी भागात पाणी साचल्याने बस आणि खासगी वाहनांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होताना दिसतेय.

दरम्यान, मुंबईची लाईफलाईन म्हटल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनला देखील मुसळधार पावसाचा फटका बसल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल उशिराने धावत असताना मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक काही मिनिटांसाठी ठप्प झाली आहे. विशेषत: हार्बर मार्गावरील गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे, मिळालेल्या माहितीनुसार, हार्बर मार्गावर सध्या लोकल गाड्या बंद आहेत. ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल चालवणे शक्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
पावसामुळे अनेकांना कार्यालयात पोहोचता आले नाही. तर यापैकी काही लोकांना घरून काम करण्याची परवानगी मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. मुंबईबरोबरच नवी मुंबई, ठाणे, पालघर या शहरांनाही मुसळधार पाऊस पडत असून या शहरांचीही मुंबईसारखीच स्थिती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.