मुंबईत अतिवृष्टीसह वाहणार जोरदार वारे, ‘या’ भागात पावसाच्या संततधारेचा इशारा

नवी मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्येही पावसाच्या संततधारेचा इशारा

91

वाढत्या पावसाच्या जोरासह मुंबईत गुरुवारी जोरदार वारे वाहतील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत ताशी ४० ते ५० वेगाने वारे वाहणार आहे. मुंबईत बहुतांश ठिकाणी दर तासाला ३० मिलीमीटर पाऊस होईल, काही ठिकाणी सलग तिस-या दिवशी मुंबईत २०४.५ मिलीमीटर पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे.

(हेही वाचा – मुंबईकरांनो! CSMT ते वडाळा रेल्वे वाहतूक बंद; हार्बर मार्गावर 2 तासांचा विशेष ब्लॉक)

गेल्या १२ तासांत १०० मिमीच्या जवळपास पाऊस

गेल्या १२ तासांत मुंबईतील बहुतांश भागांत रात्री पुन्हा पावसाची संततधार सुरु होती. मुंबईतील बहुतांश भागांत गेल्या बारा तासांत १०० मिमीच्या जवळपासच पाऊस झाला. मंगळवार आणि बुधवारच्या तुलनेत फारसा पाऊस झाला नाही. संपूर्ण २४ तासांत सकाळी साडेआठच्या नोंदीत कुलाब्यात ११०.६ मिमी, सांताक्रूझ येथे १२५ मिमी पाऊस झाल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली.

कुठे किती झाली पावसाची नोंद

गेल्या २४ तासांत कुलाबा येथे ८० मिमी पाऊस झाला. मध्य मुंबईतील चेंबूर ते विद्याविहारदरम्यान केवळ ४० मिमीपर्यंत पाऊस झाला. दक्षिण मुंबईत केवळ २० ते ३० मिमी दरम्यान पाऊस झाला. नरिमन पोईंट येथे ५६.८९ मिमी, पालिका मुख्य कार्यालय परिसरात ६९.१ मिमी पाऊस झाला. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरेला लागून असलेल्या परिसरात पावसाचा जोर जास्त होता. मरोळ येथे १०८.६ मिमी, मुंबई विमानतळ येथे ६२.५ मिमी, जोगेश्वरी परिसरात ९७,५१ मिमी, अंधेरीत ८०.४९ मिमी, मुलुंड येथे ७६.८६, बोरिवली पश्चिमेला ७१.०९ मिमी पाऊस झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.