हेनरिक रुडॉल्फ हर्ट्झ (Heinrich Hertz) हे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (German physicist) होते. हेनरिक रुडॉल्फ हर्ट्झ यांचा जन्म १८५७ मध्ये हॅम्बुर्ग येथे झाला. त्यांचे कुटुंब हे समृद्ध आणि सुसंस्कृत हॅन्सेटिक कुटुंब होते. त्यांच्या वडिलांचं नाव गुस्ताव फर्डिनांड हर्ट्झ होते. तर त्यांच्या आईचं नाव ऍना एलिझाबेथ फेफरकॉर्न असे होते.
त्यांनी ड्रेस्डेन, म्युनिक आणि बर्लिन या जर्मन शहरांमध्ये विज्ञान आणि अभियांत्रिकीचा अभ्यास केला. १८८० मध्ये, त्यांनी बर्लिन विद्यापीठातून पीएचडी प्राप्त केली आणि पुढील तीन वर्षे हेल्महोल्ट्झचे सहाय्यक म्हणून पोस्ट-डॉक्टरेटचा अभ्यास केला. १८८३ मध्ये हर्ट्झ हे कील विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकशास्त्रात लेक्चरर म्हणून रुजू झाले. १८८५ मध्ये हर्ट्झ कार्लस्रुह विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून काम करु लागले.
जेम्स क्लर्क मॅक्सवेलने (James Clerk Maxwell) यांनी मांडलेल्या प्रकाशाचा उगम म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा लहरी हा सिद्धांत हर्ट्झ यांनी विकसित केला. त्यांनी सर्वप्रथम प्रयोगशाळेत रेडिओ लहरींचे प्रसारण करण्यासाठी आणि पकडण्यासाठी पकरणे बनवली.
हर्ट्झ यांनी १८८८ मध्ये रेडियो लहरींचा शोध लावला. नंतर त्यांनी सिद्ध करुन दाखवले की प्रकाश म्हणजे विद्युतचुंबकीय लहरींचाच एक प्रकार असतो. त्यांच्या या महत्वाच्या कार्याचा सन्मान म्हणून रेडिओ फ्रिक्वेन्सी मोजण्याचे नाव “हर्ट्झ” असे ठेवण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community