मंगळवारी, २८ जून २०२२ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास मुंबईच्या पवनहंस येथून समुद्रात असणाऱ्या ओएनजीसीच्या दिशेने हेलिकॉप्टर निघाले. मात्र हे हेलिकॉप्टर मुंबईपासून ६० नॉटिकल मैल अंतरावर सागर किरण रिगजवळ समुद्रात कोसळले. यामध्ये ४ जनांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात पाच जणांना वाचविण्यात नौदल तसेच तट रक्षक दलाला यश आले आहे.
In a swiftly coordinated maritime life saving operation in Arabian Sea, prudent coordination amidst stakeholders resulted in accounting of all 9 pax of the ill fated @ONGC_ Pawan Hans. Alert eyes and prompt response at the western seaboard’s concerted efforts resulted in #SAR ops pic.twitter.com/O62ARY5GEv
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) June 28, 2022
बचाव कार्य सुरू
मृतांमध्ये तीन कर्मचारी आणि एका ओएनजीसी हंगामी कामगाराचा समावेश आहे, त्यांचे मृतदेह कूपर रुग्णालयात आणण्यात आले असल्याची माहिती जुहू विमानतळाचे संचालक ए के वर्मा यांनी दिली. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर VT- PWI असे होते, तसेच एकदम नवीन Sikorsky S 76 D होते. “आमचे डॉर्नियर विमान दमण एअरबेसवरून शोध आणि बचावासाठी घटनास्थळी पोहोचले आहे. ओएनजीसीने एक हेलिकॉप्टर आणि एक जहाजही पाठवले आहे, असे तटरक्षक दलाचे महासंचालक वीरेंद्र पठानिया यांनी यापूर्वी सांगितले होते.
(हेही वाचा मेळघाटातील आदिवासी समृद्धीच्या दिशेने! बांबूपासून बनवलेल्या हजारो राख्या जातात सातासमुद्रापलीकडे)
ओएनजीसी (ऑइल नेचुरल गॅस कॉर्पोरेशन) कंपनीने प्रसारमाध्यमासाठी जारी करण्यात आलेल्या पत्रकात या दुर्घटनेची माहिती दिली आहे. ओएनजीसी यांनी पत्रकात म्हटल्यानुसार ओएनजीसी ऑफशोर रिंग सागरकिना-यापासून एक नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या अरबी समुद्रावर मंगळवारी सकाळी ११.४५ च्या सुमारास दोन वैमानिकांसह नऊ व्यक्तींना घेऊन निघालेल्या एका हेलिकॉप्टरने आपत्कालीन लँडिंग केले, यामध्ये चार जनांचा मृत्यू झाला असून पाच जणांना वाचवण्यात नौदल आणि तटरक्षक दलाला यश आले आहे. प्रादेशिक आकस्मिक योजना (पश्चिम) (आरसीपी) त्वरित सक्रिय करण्यात आली; भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. शोध आणि बचाव मोहिमेसाठी ओएनजीसीच्या जहाजांना त्या ठिकाणाजवळ जमवण्यात आले. तत्परतेने कारवाई करून,ओएनजीसी रिग सागर किणा-यावरून सोडण्यात आलेल्या लाइफ बोटद्वारे एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आणि ओएनजीसीकडे स्टँडबाय असलेल्या मालवीय १६ या जहाजाने चार जणांची सुटका केली. प्रतिकूल हवामान असूनही, बचाव कार्य अतिशय वेगाने पार पाडण्यात आले असल्याची माहिती ओएनजीसीच्या अधिकारी यांनी दिली.