Hemant Chauhan : गुजरातमधील प्रसिद्ध भजन गायक आणि लोकगायक हेमंत चौहान

269
Hemant Chauhan : गुजरातमधील प्रसिद्ध भजन गायक आणि लोकगायक हेमंत चौहान
Hemant Chauhan : गुजरातमधील प्रसिद्ध भजन गायक आणि लोकगायक हेमंत चौहान

हेमंत चौहान हे गुजराती भाषेतील सुप्रसिद्ध भजन गायक आणि लोकगायक आहेत. (Hemant Chauhan) आयुष्यात पाच हजारांहून अधिक स्टेज प्रोग्राम केलेले हेमंत चौहान यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय साधे आहे. त्यांनी १९७८ मध्ये त्यांच्या भजनांची पहिली कॅसेट प्रसिद्ध केली. यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. (Hemant Chauhan)

हेमंत चौहान अगदी लहान असताना त्यांना इंदिरा गांधींना भेटण्याची संधी मिळाली. शाळेच्या कार्यक्रमात हेमंत चौहान यांनी एक गाणे गायले होते. इंदिरा गांधींवर याचा मोठा प्रभाव पडला होता. चालता चालता त्या हेमंत चौहान यांच्याजवळ आल्या आणि त्यांनी विचारले, “बेटा, तुला काय व्हायचे आहे ?” पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रश्नावर काय उत्तर द्यायचे, हे चौहान यांचा कळलं नाही. पुढे त्यांची भजनसम्राट म्हणून ख्याती झाली. मात्र अजूनही त्यांनी इंदिरा गांधींसोबतचा फोटो जपून ठेवला आहे.

(हेही वाचा – Shivaji Maharaj Statue at Indo-Pak Border : भारत-पाक सीमेवर आता शिवाजी महाराजांची शौर्यगाथा; वाढला महाराष्ट्राचा गौरव)

९ ऑक्टोबर २०१२ रोजी ‘अकादमी रत्न पुरस्कार २०११’ देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे. हेमंत चौहान यांना गुजरात सरकारकडून ‘गुजरात गौरव सन्मान’ आणि ‘राष्ट्रपती पुरस्कार’ही मिळाला आहे. गुजराती भजन, गरबा इत्यादी गुजरातच्या लोकगायनात हेमंत चौहान यांनी अनन्यसाधारण योगदान दिले आहे. हेमंत चौहान गेली अनेक दशके गुजरातमध्येच नव्हे, तर देशात आणि जगात भजन सादर करत आहेत. तसेच त्यांनी ८,००० हून अधिक भजन गाऊन विश्वविक्रमही केला आहे. (Hemant Chauhan)

हेमंत चौहान मूळचे राजकोटचे. पूर्वी ते आरटीओ मध्ये नोकरी करत होते. संगीत साधना करण्यासाठी नंतर त्यांनी आरटीओमधील आपली नोकरी सोडली. पूर्णवेळ संगीत क्षेत्रातमध्ये स्वतःला वाहून घेतलं. भारत सरकारने हेमंत चौहान यांना २०२३ मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित केले. “कला ही एक अध्यात्मिक साधना आहे आणि फक्त खरा भक्तच ती योग्यरित्या शिकू शकतो, ज्याने आपले संपूर्ण आयुष्य या आध्यात्मिक साधनेसाठी समर्पित केले आहे. जो तासनतास सराव करतो आणि स्वतःला संगीतात गुंतवून घेतो.” त्यांना हा संदेश सर्व गायकांसाठी वा संगीताच्या उपासकांसाठी अतिशय महत्वाचा आहे. ते गुजराती आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये भजने गातात आणि या भजनाने त्यांना एक नवी ओळख दिली आहे. (Hemant Chauhan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.