भारतात श्रीमंताची संख्या (Henley & Partners Report) वाढत चालली असली तरी भारताला सोडून जाणाऱ्या श्रीमंत कोट्यधीशांचीही संख्या वाढत आहे. यावर्षी ४,३०० भारतीय कोट्याधीश नागरिक भारताला राम राम ठोकून इतर देशात जाणार असल्याचा ताजा अहवाल समोर आला आहे. यापैकी बरेचसे धनाढ्य आखाती देशांची निवड करण्याची शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. लंडनच्या ‘हेन्ली अँड पार्टनर्स’ या गुंतवणूक सल्लागार संस्थेने या संबंधी एक अहवाल प्रकाशित केला आहे, ज्यामध्ये ही माहिती दिली. (Henley & Partners Report)
भारताने चीनलाही टाकले मागे
मागच्यावर्षी ५,१०० कोट्यधीश भारतीय नागरिक देश सोडून इतर देशांत स्थलांतरित झाले होते, असा अहवाल याच संस्थेने दिला होता. वेगाने अर्थव्यवस्थेत प्रगती होणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे. चीन आणि युक्रेननंतर कोट्यधीशांचे स्थलांतर होणाऱ्या देशांमध्ये भारताचा आता तिसरा क्रमांक लागत आहे. तसेच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताने चीनलाही मागे टाकले आहे. मात्र कोट्यधीशांच्या संख्येत भारत अजूनही चीनच्या मागे आहे. भारतात चीनपेक्षा ३० टक्के कमी कोट्यधीश आहेत. (Henley & Partners Report)
कोट्यधीशांच्या स्थलांतराचे कारण काय?
जगभरातील १,२८,००० कोट्यधीश नागरिक २०२४ या वर्षात स्थलांतरीत करण्याच्या तयारीत आहेत. युएइ आणि युएसए या देशांमध्ये कोट्यधीश स्थलांतरित होण्यास प्राधान्य देत आहेत. स्थलांतर करण्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्यापैकी सुरक्षितता, आर्थिक स्थैर्य, करांमध्ये सवलत, निवृत्तीनंतरचे आयुष्य, नव्या व्यावसायिक संधी, चागंल्या जीवनमानाची अपेक्षा, मुलांसाठी चांगल्या शिक्षणाच्या संधी, आरोग्याच्या सुविधा आणि चांगल्या दर्जाचे आयुष्य जगण्यासाठी कोट्यधीश स्थलांतरित करत आहेत. (Henley & Partners Report)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community