सुप्रसिद्ध लेखक आणि कादंबरीकार हेनरी मिलर (Henry Miller) यांचा जन्म २६ डिसेंबर १८९१ रोजी न्यू यॉर्क येथे झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर मिलर (Henry Miller) वेस्टर्न युनियनमध्ये काम करु लागले. त्यांनी तेथे १९२० ते १९२४ या काळात मेसेंजर विभागात कर्मचारी व्यवस्थापक म्हणून काम केले. विशेष म्हणजे सुट्टीमध्ये म्हणजे तीन आठवड्यांतच त्यांनी क्लिप्ड विंग्ज नावाची पहिली कादंबरी लिहिली. मात्र ही कादंबरी कधीच प्रकाशित झाली नाही.
मिलर (Henry Miller) यांची लेखनशैली तत्कालीन लेखकांपेक्षा भिन्न होती. ते मोकळ्या विचारांचे होते. विनोद ही त्यांच्या लेखनाची जमेची बाजू होती. विनोदाच्या अंगाने त्यांनी लोकांच्या सुप्त इच्छा प्रकट केल्या. लोक आपल्या भावना बोलून दाखवत नसत. मात्र त्यांच्या लेखनातून त्या भावनांचा वाट मोकळी करुन दिली गेली.
(हेही वाचा-Charles Babbage : फादर ऑफ कम्प्युटर चार्ल्स बॅबेज)
त्यांनी लेखन शैलीत चांगुलपणा आणि वाईटपण या दोन्ही तत्वांचा स्वीकार केला होता. ते सेक्सवर मनमोकळेपणाने लिहायचे. म्हणूनच की काय १९६० पर्यंत त्यांच्या काही साहित्य कृतींवर ब्रिटन आणि यूएसमध्ये बंदी घालण्यात आली होती. मात्र त्यांच्या पुस्तकांच्या प्रतींची फ्रान्सहून तस्करी व्हायची. म्हणूनच ते चांगलेच लोकप्रिय झाले होते.
त्यांनी ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न, द कॉलोसस ऑफ मारौसी, नाइटमेअर अशी पुस्तके लिहून रसिकांना स्वतःकडे आकृष्ट केले. द कॉस्मोलॉजिकल आय, द व्हिसडम ऑफ हार्ट अशी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी अनेक लभू कथा आणि निबंधे देखील लिहिले आहेत. १९३४ ते १९८० हा त्यांच्या लिखाणाचा काळ मानला जातो.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community