15 ऑगस्ट अन् 26 जानेवारी या दोन दिवसांचे काय आहे वेगळेपण? जाणून घ्या…

163

आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहेत. त्यातल्याच काही महत्त्वाच्या गोष्टींमधील एक म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोहोंमधला नेमका फरक काय?   या दोन दिवसांमधला मुख्य फरक आज आपण जाणून घेऊया.

हे आहेत मुख्य फरक

  • 15 ऑगस्टला पंतप्रधान झेंडा फडकवतात, तर 26 जानेवारीला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात.
    कारण, देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वातच आले नव्हते.
  • 15 ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो. त्याला ध्वजारोहण (flag hoiating) म्हणतात, तर 26 जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून, सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो. फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला झेडा फडकवणे (flag unfurling) म्हणतात.

( हेही वाचा: लोकशाही व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी, मतदान करा, उपराष्ट्रपतींचे आवाहन )

  • 15 ऑगस्ट 1947 ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरला व भारताचा झेंडा वर चढला, म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात. तर, 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो, म्हणून त्याला झेंडा फडकवणे म्हणतात.
  • 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते, तर… 26 जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.