देशासाठी वयाच्या ३१व्या वर्षी बलिदान देणारे शूरवीर Mohit Sharma

227
मेजर मोहित शर्मा (Mohit Sharma) हे भारतीय लष्कराचे अधिकारी होते. मेजर शर्मा हे १ पॅरा एसएफशी संबंधित होते. मोहित यांचा जन्म १३ जानेवारी १९७८ रोजी हरियाणातील रोहतक येथे झाला. त्यांना त्यांच्या घरचे लाडाने “चिंटू” अशी हाक मारायचे. त्यांचे एनडीए बॅचचे सहकारी त्यांना “माईक” म्हणायचे. आज चिंटू आणि माईक अशी हाक मारल्यावर कोणीही उत्तर देत नाही. कारण २१ मार्च २००९ रोजी कुपवाडा जिल्ह्यात आपल्या ब्राव्हो आक्रमण पथकाचे नेतृत्व करताना त्यांना वीरमरण आले.
त्यांनी १९९५ मध्ये डीपीएस गाझियाबादमधून १२वी पूर्ण केली. त्याच दरम्यान त्यांनी एनडीएची परीक्षा दिली होती. १२ वी पूर्ण केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. पण कॉलेजमध्ये असताना त्यांनी एनडीएसाठी एसएसबी उत्तीर्ण केले आणि भारतीय सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. देशाची सेवा करण्यासाठी भारतमाता त्यांना हाक मारत होती. कॉलेज सोडून ते नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीमध्ये (एनडीए) दाखल झाले.
२१ मार्च २००९ रोजी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमधील हाफ्रुडा जंगलात दहशतवाद्यांशी चकमक झाली. या चकचकीत त्यांनी चार दहशतवाद्यांना जन्नतचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर दोन साथीदारांची सुटका केली. मात्र हा पराक्रम गाजवताना गोळीबारामुळे त्यांना अनेक जखमा झाल्या. अखेर त्यांना वीरमरण प्राप्त झाले. ते हुतात्मा झाले. त्यांचुआ या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांची पत्नी देखील सैन्यात देशसेवा करत आहे. आपल्या पतीचा वारसा ही वीरपत्नी रिशिमा शर्मा योग्यरितीने पुढे नेता आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.