पाकच्या बोटीतून जप्त केले तब्बल ४०० कोटींचे हेरॉईन!

124

गुजरातमध्ये एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत गुजरात किनाऱ्यावर पाकिस्तानची एक मासेमारी करणारी बोट ताब्यात घेण्यात आली आहे. या पाक बोटीतून ७७ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत तब्बल ४०० कोटी रूपये असून ही कारवाई भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाकडून संयुक्तरित्या रविवारी रात्रीच्या वेळात करण्यात आली आहे.

मुद्देमालासह 6 जणांना ताब्यात

यासंदर्भातील माहितीनुसार गुजरातच्या समुद्री किनरपट्टीवर गस्त घालत असताना एक पाकिस्तानी नाव आढळून आली. या नौकेची तपासणी केली असता त्याठिकाणी ७७ किलो हेरॉइन आढळून आली. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार याची किंमत ४०० कोटी रुपये आहे. या बोटीवरील ६ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरु आहे. गुजरात सीमेवर घुसखोरांवर करडी नजर ठेवणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या आणि एटीएसच्या संयुक्त मोहिमेवेळी पाकिस्तानी बोट अल हुसैनी आढळली. त्यानंतर जवानांनी तात्काळ बोटीवर कारवाई करत मुद्देमालासह ६ जणांना ताब्यात घेण्यात आले. बोटीवर असणारे सर्वजण हेरॉइनच्या तस्करीत होते.

(हेही वाचा – मनसेच्या पायावर शिवसेनेचा कळस)

यापूर्वीही तीन हजार किलोचे ड्रग्ज जप्त 

यापूर्वी १५ सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये अदानी समूहाकडे मालकी असलेल्या मुंद्रा पोर्टवरून तीन हजार किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी अफगाणिस्तान येथून दोन कंटेनरच्या माध्यमातून आलेलं हिरॉईन हे तब्बल १५ हजार कोटी किंमतीचे होते. १५ सप्टेंबर रोजी ही कारवाई केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या महसूल गुप्तचर संचालनालय आणि कस्टम विभागाच्या वतीने करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.