सदावर्तेंना उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर

मुंबईत शरद पवारांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनानंतर राज्यात अनेक ठिकाणी गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र मंगळवारी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील सदावर्ते यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये न्यायालयाने सदावर्तेंना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

(हेही वाचा – राणा दाम्पत्याला दुसऱ्या दिवशीही दिलासा नाही, कधी होणार पुढील सुनावणी?)

२५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका

न्यायालयाने सदावर्तेंना अटकपूर्व जामीन दिल्यानंतर २५ हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. २०२० मध्ये सदावर्ते यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकऱणी ताबा मिळवण्यासाठी पुणे पोलिसांकडून अर्ज दाखल कऱण्यात आला आहे. परंतु, कोल्हापूर पोलीस सदावर्तेंना घेऊन ऑर्थर तुरूंगाकडे रवाना झाले असल्याचे सांगितले जात आहे.

सदावर्तेंना मोठा दिलासा

महाराष्ट्रातील विविध भागात सदावर्तेंविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुण्यात दाखल एका गुन्ह्यामध्ये सदावर्तेंना उच्च न्यायालयाने २५ हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन देण्याचे आदेश दिल्याने सदावर्तेंना मोठा दिलास मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात मराठा समाजाविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याने गुन्हा दाखल असून त्यासाठी सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी पोलीस कोल्हापूर न्यायालयात दाखल झाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here