कांदिवली पश्चिम येथील ‘हंसा हेरिटेज’ इमारतीच्या १४ व्या मजल्यावर शनिवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दोन जण जखमी झाले आहेत. रात्री साडेदहा वाजेपर्यंत आठ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. घरात लावलेल्या पणतीमुळे पडद्याने पेट घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत दोन जण जखमी झाले, यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुसर्या जखमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार शुरू आहे.
कांदिवली पश्चिम येथील मथुरादास रोडवर हंसा हेरिटेज ही पंधरा मजल्याची इमारत असून चौदाव्या मजल्यावर ही आग लागली. दिवाळीसाठी लावलेल्या पणतीमुळे घराच्या पडद्याने पेट घेतला. त्यातून ही आग वाढत गेली अशी माहिती येथील रहिवाशांनी दिली. इमारतीच्या खिडक्यांमधून आगीच्या ज्वाला बाहेर येत होत्या. आगीत कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. आगीच्या सद्यस्थितीची माहिती अग्निशमन दल अधिकाऱ्याकडून घेतली.
https://twitter.com/KishoriPednekar/status/1457023108871692288
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या दाखल झाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीत दोन जण जखमी झाले, यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुसर्या जखमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार शुरू आहे.
Join Our WhatsApp Community