धारावी या आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टी भागातील रहिवाशांसाठी मुंबई महापालिका आधुनिक पद्धतीचे सुविधा केंद्र उभारत असून त्यात १११ शौचकूपांसह आंघोळीची व कपडे धुण्याची देखील अत्याधुनिक व यांत्रिक सुविधा असणार आहेत. या सुविधा केंद्राचे भूमिपूजन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. विशेष म्हणजे या सुविधा केंद्राची उभारणी ‘हिंदुस्तान युनिलिव्हर’ या कंपनीच्या ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’मधून करण्यात येणार असून यासाठी सुमारे ९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पुढील सहा महिन्यांत उभारणार सुविधा केंद्र!
पुढील सहा महिन्यांत धारावीकरांच्या सेवेत रुजू होणाऱ्या या सुविधा केंद्राच्या परिसरातील सुमारे ५ हजार व्यक्तींना याचा लाभ होईल, अशी माहिती महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील धारावी परिसरात मुंबईतील सर्वात मोठे सुविधा केंद्र उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
(हेही वाचा : ‘आयसिस’मध्ये गेलेल्या अरीब माजिदला उच्च न्यायालयाचा जामीन! म्हणाले, त्याची ‘ती’ चूक होती! )
- २०१६ मध्ये घाटकोपरमधील आजाद नगर परिसरात पहिले सुविधा केंद्र उभारण्यात आले होते. आता महानगरपालिका क्षेत्रातील सहावे सुविधा केंद्र धारावी परिसरात उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे सुविधा केंद्र मुंबईतील सर्वात मोठे सुविधा केंद्र ठरणार आहे. या सुविधा केंद्रात १११ शौचकूप, ८ स्नानगृह आणि कपडे धुण्यासाठी १० मोठ्या आकाराची यंत्रे असणार आहेत.
- सुमारे तीन हजार चौरस मीटर आकाराच्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या व तीन मजली असणाऱ्या या भव्य सुविधा केंद्रामध्ये स्त्री, पुरुष, दिव्यांग, लहान मुले यांच्यासाठी स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणार आहेत. तसेच हे सुविधा केंद्र गंध मुक्त असेल याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.
- या सुविधा केंद्रातील स्नानगृहाचा लाभ घेणाऱ्यांना साबणाची वडीही दिली जाणार असून आंघोळ करताना गरम पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सुविधा केंद्राच्या वर वैशिष्ट्यपूर्ण सोलर पॅनल बसविले जाणार आहेत.
- अधिकाधिक पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने सौर ऊर्जेचा वापर करण्यासोबतच या सुविधा केंद्रातील वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर होण्याच्या दृष्टीने प्रक्रिया केंद्र देखील कार्यान्वित केले जाणार आहे.
- या सुविधा केंद्राचा लाभ घेणाऱ्यांना प्रति लिटर पाण्यासाठी केवळ एक रुपया शुल्क आकारले जाणार असून परिसरातील नागरिकांना केवळ १५० रुपयांत कौटुंबिक मासिक पास दिला जाणार आहे. यामध्ये कुटुंबातील ५ व्यक्तींना निर्धारित सुविधा प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच या ठिकाणी लहान मुलांना मोफत प्रवेश असणार आहे. त्याचबरोबर यांत्रिक पद्धतीने कपडे धुण्याची सुविधादेखील या सुविधा केंद्रात अत्यंत माफक दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सर्व पाहण्यात तर खूपच चांगले वाटत आहे, या गोष्टीमुळे मला २०१३ सलची आठवण होत आहे, मुखमंत्रांच्या हातून धारावी क्रीडा संकुलाचे उद्घाटन झाले व या मध्मातून धारावीतील मुलांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या, मी पण जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून कीकबॉक्सिंग प्रशिक्षक म्हणून तेथे रजू झालो, खेळाडूंसाठी विविध उपक्रम राबवले, मी नुसते तोंडी बोलत नाही तर पुढील लिंक वर आपण सर्व शहनिशा करू शकाल http://www.sskka.com. पण पुढे ही गोष्टीचा आलेख वाढला का? नाही….. हे पूर्ण क्रीडा संकुल खाजकिकरण करण्यात आले, सरकारी जमिनीवर अशा गोष्टी करायच्या व नंतर त्या खाजकिकरणात बदलून २टक्के श्रीमंत लोकांना त्याचा लाभ करून द्यायचा, पण आताची पिढी व आम्हीपण या सर्व घडामोडीमुळे जागृत आहोत, पा राजकारणी कधी काय करतील त्याचा नेम नाही !
उमेश मुरकर – पत्रकार – पंचनामा गुन्हेगारीचा ९८२०४८६१०५
धारावी क्रीडा संकुल येथे तत्काली नमुख्यमंत्र्यांनी अशाच प्रकारे जल 2013 सली जल्लोषात उद्घाटन केले होते व ती जागा गोरगरीब मुलांसाठी व खेळासाठीच उपयोगात आणावी असे त्यांनी त्यावेळी आपल्या भाषणात सांगितले होते. तिच्या काळात सर्वांना चांगले सुखसोई खेळाडूंना चांगले प्रशिक्षक नेमण्यात आले व सर्व काही ठीक चालले असतानाच सदर क्रीडा संकुल याचे खाजगीकरण करण्याचे बेत आखण्यात आले व 2019 आली कॉम्प्लेक्स चे खाजगीकरण करण्यात आले. अशाच प्रकारे सरकारी जागा हेरून त्यावर लोक उपयोगी अशी काम करत करत आहे असे भासवून त्यावर काही निर्माण करायचे व ते तोट्यात चालले असे म्हणून त्याचे खासगीकरण करायचे हीच काम आतापर्यंत झाली आहेत. नागरिकांना विश्वासात घेऊन नंतर त्यांचा विश्वास घात करण्याची रीत झाली आहे. धारावीतील नागरिकांनी दिखाव्याला समोर जाऊ नये सत्यता पडताळून ज्या कामासाठी बांधले गेले आहे ते चांगल्या प्रकारे ला राबवले पाहिजे. फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचा लाभ प्रथमता येथील स्थानिक नागरिकांना झाला पाहिजे व त्यांचा विचार करण्यात आला पाहिजे.
सदर 19 जणांची घरे तोडून वातानुकुलीत बनवण्याचा हा बाल हट्ट म्हणावा लागेल आगोदरच लोकांना जी शौचालय आहे त्याचा वापर करताना त्रास होतो, महानगरपलिका मूलभूत सुविधा देण्यास कमी पडत असताना, करोना काळात धारावीतील दवाखान्यात हा फंड वापरता आला असता तर बरे झाले असते,
शौचाल्याच्या बाजूला असलेली जुने शौचालय बंद आहे ती अगोदर चालू करावी
Very nice