भीषण अपघात, खोल दरीत शालेय बस कोसळून 10 जणांचा मृत्यू

127

हिमाचल प्रदेशाताली कुल्लूमध्ये भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेने जात असलेली एक खासगी बस रस्त्यावरून घसरली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू तर जखमींमध्ये एका शालेय विद्यार्थ्यासह बसचा चालक, वाहक गंभीर जखमी आहे. जावळा गावापासून जवळपास २०० मीटर अंतरावर असताना ही बस दरीत कोसळली.

(हेही वाचा – बहुमत चाचणीआधी शिवसेनेला धक्का; आमदार संतोष बांगर शिंदे गटात!)

जखमींना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात येत असल्याची माहिती कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी दिली. सकाळी साडे आठ वाजता झालेल्या या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला, या बसमध्ये ४० ते ५० प्रवासी होते. या अपघात अनेक जण जखमी झाले असून घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

https://twitter.com/ANI/status/1543814559026528256

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघातावर ट्विट केले असून ते म्हणाले की, हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दु:खाच्या काळात माझ्या शोकसंवेदना, मी शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. मला आशा आहे की जे जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील. स्थानिक प्रशासन बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करत आहे.

https://twitter.com/PMOIndia/status/1543821262610305025

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.