गेल्या वर्षभरापासून देशात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला असताना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने दहशत निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत कोरोना लसीकरणाबाबात देशाने नवा रिकॉर्ड केला आहे. देशात आतापर्यंत देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत 127.61 कोटी लोकसंख्येला कोरोना विरोधी लसीचे डोस देण्यात आले आहेत. अशातच कौतुकास्पद बाब म्हणजे राज्यातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिलं राज्य ठरलं असून जिथे सर्व नागरिक लसवंत झाले आहे.
एम्सकडून होणार राज्याचा विशेष सन्मान
राज्यातील सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशच्या नावे हा नवा विक्रम प्रस्थापित झाला असून राज्यातील सर्व नागरिकांना सर्वप्रथम पहिला डोस देण्याचा विक्रमही हिमाचल प्रदेशच्या नावेच आहे. इतकेच नाही तर या राज्यातील एकूण 53,86,393 प्रौढ नागरिकांना कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात हिमाचल प्रदेशेने राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला होता. या कौतुकास्पद कामगिरीमुळे आता एम्सकडून या राज्याचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचेही म्हटले जात आहे.
(हेही वाचा- नवा रेकॉर्ड! देशात निम्मी लोकसंख्या कोरोनाचे दोन्ही डोस घेऊन लसवंत)
देशात निम्म्या लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस
दोन दिवसांपूर्वी देशातील लसीकरणासाठी पात्र असलेल्या निम्म्या लोकसंख्येला कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, अशी माहिती भारत सरकारकडून देण्यात आले आहे. दरम्यान, एकाच दिवसांत देशात एक कोटी लसीचे डोस देण्याचा विक्रमी कामगिरी केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ट्वीट करत यावेळी आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनीही ट्वीट करत भारतीयांचे आभार मानले आहेत.