दारूच्या प्रत्येक बाटलीवर १० रुपये गोमाता अधिभार! देशातील ‘या’ राज्याचा मोठा निर्णय

हिमाचल प्रदेश सरकारने दारूच्या प्रत्येक बाटलीवर १० रुपये गोमाता अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, यादरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी हिमाचल प्रदेश सरकारने हा निर्णय घेतला आहे. मद्याच्या प्रत्येक बाटलीमागे १० रुपये गोमाता अधिभार लावल्यामुळे राज्य सरकारला वर्षाला १०० कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे आता हिमाचलमध्ये दारू महागणार आहे.

( हेही वाचा : खासदारांची पेन्शन बंद करा; कोणत्या खासदाराने पंतप्रधान मोदींनाच लिहिले पत्र)

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी शुक्रवारी आपला पहिला अर्थसंकल्प मांडला. यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या अर्थसंकल्पामुळे राज्याला एक नवी दिशा मिळेल असेही सुक्खू म्हणाले.

  • हिमाचल प्रदेश सरकारच्या बजेटमधील महत्त्वाच्या घोषणा
  • चार्जिंग स्टेशनसाठी राज्य सरकार ५० टक्के अनुदान देणार.
  • युवकांना रोजगार मिळावा यासाठी व्यावसायासाठी ४० टक्के सबसिडी देण्यात येईल.
  • अंगणवाडी सेविकेला महिन्याला ९५०० रुपये मानधन
  • अंगणवाडी मदतनीस आणि आशा सेविकांना प्रत्येकी ५२०० रुपये मानधन
  • मुख्यमंत्री रोजगार संकल्प सेवा सुरू करण्यात येणार.
  • २० हजार मुलींना उच्च शिक्षणासाठी इलेक्ट्रिक स्कूटी खरेदीसाठी २५ हजारांचे अनुदान देण्यात येईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here