डॉ. अनिल मिश्र यांना राज्य सरकारच्या हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आयआरएस अधिकारी डॉ. अनिल मिश्र यांना डॉ. राम मनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख रकमेचा हा पुरस्कार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवार, १० मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध योजना राबवते, त्यानुसार हिंदी साहित्य क्षेत्रात मोलाचे कार्य आणि भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिकांना तसेच दरवर्षी उत्कृष्ट वाङमय निर्मितीकरिता लेखकांना उत्तेजन देण्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुसार हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी डॉ. अनिल मिश्र यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आयआरएसचे १९९९ च्या बॅचचे अधिकारी असलेले डॉ. अनिल मिश्र जरी प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असले तरी त्यांनी हिंदी साहित्य निर्मिती क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. साहित्य, काव्य, समीक्षा इत्यादी क्षेत्रात डॉ. मिश्र यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचे ४ काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

(हेही वाचा शिवाजी पार्कमधील ‘त्या’ खड्ड्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष)

या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र भारती अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार डॉ. विकास दवे, तर डॉ. अनिल मिश्र यांना डॉ. राममनोहर त्रिपाठी अखिल भारतीय हिंदी सेवा पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्रीय एकता पुरस्कार सुंदरचंद ठाकूर, साने गुरुजी राष्ट्रीय एकता पुरस्कार राकेश दुबे, पद्मश्री अनंत गोपाळ शेवडे हिंदी सेवा पुरस्कार राजेश्वर उनियाल,  डॉ. उषा मेहता हिंदी सेवा पुरस्कार रेखा शर्मा, गजानन माधव मुक्तिबोध मराठी भाषी हिंदी लेखक पुरस्कार विलास सूर्यकांत गीते, कांतिलाल जोशी इतर हिंदी भाषी हिंदी लेखक पुरस्कार अनिल गलगली, व्ही शांताराम ललित कला हिंदी विशिष्ट सेवा पुरस्कार अनुप जलोटा आणि सुब्रह्मण्यम भारती हिंदी सेतु विशिष्ट सेवा पुरस्कार शशी तिवारी यांसह अन्य पुरस्कारांची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here