Gopaldas Neeraj : ’बस यही अपराध मैं हर बार करता हूं. आदमी हूं, आदमी से प्यार करता हूं’ असं म्हणणारे गोपालदास नीरज कोण होते ?

हिंदी साहित्यिक, शिक्षक व गीतकार Gopaldas Neeraj यांनी अनेक कविता संग्रह प्रकाशित केले आहेत. सलग तीन वेळा चित्रपटांतील सर्वोत्कृष्ट गीतलेखनाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. विश्व उर्दू परिषद पुरस्कार, यश भारती पुरस्कार असा पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.

303
Gopaldas Neeraj : ’बस यही अपराध मैं हर बार करता हूं. आदमी हूं, आदमी से पुआर करता हूं’ असं म्हणणारे गोपालदास नीरज कोण होते ?
Gopaldas Neeraj : ’बस यही अपराध मैं हर बार करता हूं. आदमी हूं, आदमी से पुआर करता हूं’ असं म्हणणारे गोपालदास नीरज कोण होते ?

“बस यही अपराध मैं हर बार करता हूं.
आदमी हूं, आदमी से प्यार करता हूं”

किंवा

“ए भाई, जरा देख के चलो
आगे ही नं, पीछे भी
दायें ही नहीं, बायें भी
ऊपर ही नहीं, नीचे भी”

ही गाणी आजही तुम्ही गुणगुणत असाल… तुम्हाला माहिती आहे, या गीतकाराचं नाव काय आहे? त्यांचं नाव आहे गोपालदास नीरज. सिनेजगतात ते नीरज या नावाचेने प्रसिद्ध आहेत. गोपालदास नीरज (Gopaldas Neeraj) हे हिंदी साहित्यिक, शिक्षक व गीतकार होते. भारत सरकारकडून (Government of India) शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात दोनदा सन्मानित होणारे ते पहिले व्यक्ती होते. आधी पद्मश्री (Padmashri) आणि नंतर पद्मभूषण (Padma Bhushan) या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Ashish Shelar : संजय राऊतांच्या टीकेवर आशिष शेलारांचा पलटवार, म्हणाले,’… तर भर चौकात होऊ शकता नागवे’)

गोपालदास सक्सेना म्हणजेच ‘नीरज’ (Neeraj) यांचा जन्म ४ जानेवारी १९२५ रोजी आग्रा आणि अवध या संयुक्त प्रांतातील इटावा जिल्ह्यातील महेवा ब्लॉकजवळील पुरावली गावात झाला. ते ६ वर्षांचे असताना त्यांच्या बाबांचे निधन झाले. सुरुवातीचा काही काळ त्यांनी इटावा कोर्टात टायपिस्ट म्हणून काम केले आणि नंतर थिएटरमधल्या दुकानात काम केले.

पुढे त्यांनी दिल्लीला जाऊन स्वच्छता विभागात टायपिस्टची नोकरी मिळवली. तिथून नोकरी गमावल्यानंतर त्यांनी कानपूरच्या डीएव्ही कॉलेजमध्ये क्लर्कशिप केली. त्यानंतर बालकत ब्रदर्स या खासगी कंपनीत पाच वर्षे टायपिस्ट म्हणून काम केले. नोकरी करत असताना त्यांनी १९४९ मध्ये इंटरमिजिएट, १९५१ मध्ये बीए आणि १९५३ मध्ये खाजगी परीक्षा देऊन हिंदी साहित्यात प्रथम श्रेणीत एमए पूर्ण केले.

(हेही वाचा – Mangal Prabhat Lodha : बांधकाम कामगारांना इस्राईलमध्ये रोजगाराची संधी)

ते मेरठ कॉलेजमध्ये काही काळ हिंदीचे लेक्चरर होते. पुढे अलीगढमध्ये धर्म समाज कॉलेजमध्ये हिंदीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्याचबरोबर ते कवी संमेलनात भाग घेऊ लागले. दरम्यान त्यांना ‘नई उमर की नई फसल’ (Nai Umar Ki Nai Fasal) या चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची संधी मिळाली. पहिल्याच चित्रपटातील त्यांची गाणी लोकप्रिय झाली. मग पुढे मेरा नाम जोकर (Mera Naam Joker), शर्मिली (Sharmeelee), प्रेम पुजारी (Prem Pujari) अशा अनेक मोठ्या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. मात्र मुंबईच्या वातावरणाला ते कंटाळले आणि पुन्हा अलीगढमध्ये गेले.

त्यांनी अनेक कविता संग्रह प्रकाशित केले आहेत. संघर्ष, अंतर्ध्वनी, विभावरी, प्राणगीत, दर्द दिया है, बादर बरस गयो, मुक्तकी, दो गीत, नीरज की पाती, गीत भी अगीत भी, आसावरी, नदी किनारे, लहर पुकारे अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. त्यांना सलग तीन वेळा चित्रपटांतील सर्वोत्कृष्ट गीतलेखनाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. विश्व उर्दू परिषद पुरस्कार, यश भारती पुरस्कार असा पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. (Gopaldas Neeraj)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.